जिमनवाडीत ग्रामस्थांची केली वैद्यकिय तपासणी ; कोरोना बाधित आढळल्यानंतर आरोग्य विभागाने जिमनवाडी येथे लक्ष केंद्रीत

परळी :- कोरोना जागतिक महामारीचा संपुर्ण सातारा शहराला वेढा पडला आहे. सातारासह कराड शहर कोरोना मुक्तीच्या दिशेने असतानाच कराड-सातारा ग्रामीण भागात कोरोनाने हात पाय पसरवण्यास सुरुवात केले आहे. मुंबई-पुणे येथून लाखोंच्या वर प्रवासी साताऱयात दाखल झाल्याने जिल्हय़ाची धाकधूक वाढली असतानाच परळी खोरे हे कोरोनाचे नवीन हॉटस्पॉट तर होत नाही ना? असाच प्रश्न पडत आहे. याच पार्श्वभुमीवर वैद्यकिय टिमने जिमनवाडी येथे बाधित आढळल्यानंतर सतर्कता दाखवत संपुर्ण गावाची वैद्यकिय तपासणी केली.
परळी खोऱयातील रुग्णांची संख्या ही दिवसेंनदिवस वाढतच असल्याने हा संपुर्ण परिसर भितीच्या वातावणात वावराताना दिसत आहे. परळी विभागात रायघर येथे 3, कुस खुर्द 4, कुस बुद्रूक 1, खडगाव 2, चाळकेवाडी 1, जिमनवाडी 4 रुग्णांची वाढझाल्याने भागातील वैद्यकिय टिमने प्राथमिक आरोग्य केंद्राच्या विद्यकिय अधिकारी मानसी पाटील यांच्या सहाय्याने जिमनवाडी येथे संपुर्ण गावाची वैद्यिकिय तपासणी करण्यात आली. यावेळी गावातील एकूणू 142 ग्रामस्थांची तपासणी केली. यामध्ये बी.पी. शुगर, गरोदर माता, कॅन्सर तसेच 60 वर्षावरील तसेच 5 वर्षा आतील मुलांची प्राथमिक तपासणी यावेळी करण्यात आली.
यावेळी आरोग्य कर्मचारी प्रशांत ननावरे, नंदा शिलेवंत, आशा शुभांगी जिमन, सारिका शिंदे, छाया जाधव, अंगणवाडी कर्मचारी सुदर्शना बेडेकर व वैशाली मोरे यांच्या सहाय्याने जिमनवाडी येथील वैद्यिकिय तपासणी करण्यात आली.