रायघर येथे पहिल्या बाधिताचा निकटसहवासीत पुतण्या कोरोनाग्रस्त तर कुस खुर्द येथे एक कोरोना बाधित रुग्ण  

परळी :- कुस खुर्द येथील 44 वर्षीय एका संशयित रुग्णाचा गुरुवारी रात्री कोरोना बाधित असल्याचा रिपोर्ट आल्याने परळी खोऱ्यात एकच खळबळ उडाली आहे हा रुग्ण ही ट्रॅव्हल हिस्टरी मधील असून 15 मे रोजी ही व्यक्ती मुंबई (कांदवली) येथून गावाकडे आली होती चार दिवस ही व्यक्ती होम कॉरनटाईन होती. परळी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सचिन यादव यांना त्यांच्या यंत्रणेकडून समजले की या व्यक्तीस काही प्रमाणात कोरोनाची सौम्य लक्षणे आहेत त्यांनी तत्काळ 19 मे रोजी जिल्हा शासकीय रुग्णालयात सदर व्यक्तीस दाखल केले दाखल केल्यानंतर कुस खुर्द गाव जणू कंटेनमेंट झोनमध्ये गेल्यासारखे होते या गावाबरोबरच कूस बुद्रुक, खडगाव, कासारथळ या परिसरात ही भयाण शांतता पसरली होती अखेर गुरुवारी रात्री तो रुग्ण कोरोना ग्रस्त असल्याचे समजतात गावागावात धडकी भरली आहे
सदर रुग्णाबरोबर त्याने ज्या वाहनाने प्रवास केला त्या वाहनाचा ड्रायव्हर तसेच कुटुंबातील चार व्यक्तींना (हाय रिस्क कॉन्टॅक्ट) यांना विलगीकरण कक्षात हलवण्यात आले आहे शुक्रवारी सकाळपासूनच खुर्द येथे प्रशासनाने धाव घेतली

 

रायघर येथील निकटसहवासीत कोरोना बाधित

पहिल्या कोरोनाग्रस्त युवकाचा पुतण्या कोरोनाग्रस्त म्हणून गुरुवारी रात्री समोर आला आहे हा युवक गुरुवारी 14 मे रोजी दुचाकीवरून गावी आला होता मात्र तेव्हापासूनच्या वैद्यकीय तपासणी मध्ये या रुग्णाला कोणताही त्रास होत नव्हता विलगीकरण कक्षात दाखल केल्यानंतर सोम्य लक्षणे दिसू लागली व तपासणीत गुरुवारी रात्री तो कोरोनाग्रस्त असल्याचे निदर्शनास आले