पाटणला कोरोनाचा धक्क्यांवर धक्का ; काल पासून १६ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह ; पाटण तालुक्यात रुग्णांनी ओलांडली ४० शी तर एकुण रुग्ण ४३.

 

पाटण : पाटण तालुक्यातील २८ कोरोना बाधीत रुग्णांवर सध्या कृष्णा हॉस्पीटल कराड येथे उपचार सुरू असताना मंगळवारी पुन्हा एक दुसरा धक्का मिळाला. सायंकाळी ३ तर रात्री उशिरा १३ असे एकुण १६ जणांचे अहवाल पौझिटिव्ह आले. आता तालुक्यातील बाधितांची संख्या ४३ वर पोहोचली आहे. तालुक्यात तीन ठिकाणी एकूण १४४ व्यक्तींना इन्स्टीट्युशनल क्वारंटाइन करण्यात आले आहे. यापैकी बाधितांचे निकट सहवासीत कुटुंबीय, नातेवाईक आदीचे ६० हून अधिक जणांचे घशातील स्राव तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. अशी माहिती प्रांताधिकारी श्रीरंग तांबे व तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. आर. बी. पाटील यांनी दिली. तर जिल्ह्यात काल पासून ८० जणांचे अहवाल पौझिटिव्ह आले असून एकुण संख्या ४२२ झाली आहे.

दरम्यान, रात्री उशिरा आलेल्या अहवालानुसार सळवे (वरपेवाडी) येथील पती-पत्नी दोघेही तसेच नवारस्ता येथील १२ वर्षीय मुलगी असे ३ जण तर बुधवारी सकाळी आलेल्या अहवालानुसार आणि धामणी येथील ३५ वर्षीय पुरुष, ६२ वर्षीय महिला, ३० वर्षीय पुरुष, 36 वर्षीय पुरुष जांभेकरवाडी ७० वर्षीय महिला, गमलेवाडी येथील ३१ वर्षीय पुरुष, मन्याचीवाडी येथील २० वर्षीय युवक, मोरगिरी येथील ५८ वर्षीय पुरुष व ७२ वर्षीय महिला, आडदेव येथील ३५ वर्षीय पुरुष, हे दहा असे एकूण १३ जण पॉझिटिव्ह आले असून पाटण तालुक्यातील एकूण ४३ पॉझिटिव्ह रुग्ण झाले आहेत. एका महिलेचा मृत्यू झाला असून डेरवण येथील बालक बरे झाले असून सध्या क्रुष्णा हौस्पीटल कराड येथे ४१ रुग्ण उपचार घेत आहेत. बुधवारी रात्रि उशिरा आलेल्या अहवालात जिल्ह्यातील २८ जण बाधित आहेत. सातारा जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या एकुण ४२२ झाली आहे. पैकी १२६ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. १३ जण मृत्युमुखी झाले तर २८३ जनांवर उपचार सुरु आहेत.