सातारा दि. 15 (जिमाका): जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज संध्याकाळपर्यंत 930 नागरिकांना घरी सोडण्यात आले असून 883 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
*883 जणांचे नमुने पाठविले तपासणीला*
स्व. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथील 20,उपजिल्हा रुग्णालय कराड 44, उपजिल्हा रुग्णालय फलटण 53, कोरेगाव 80, वाई 126, खंडाळा 73, रायगांव 80, पानमळेवाडी 118, महाबळेश्वर 85, खावली 33 व कृष्णा मेडीकल कॉलेज कराड 171 असे एकूण 883 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहेत,अशी माहितीही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
घेतलेले एकूण नमुने –58252
एकूण बाधित — 25476
घरी सोडण्यात आलेले — 16524
मृत्यू — 725
उपचारार्थ रुग्ण –8227
00000