महिगावचा तलाठी लाचलुचपतच्या जाळ्यात

सातारा : महिगाव ता जावली येथील तलाठी शीतल सुरेंद्र गुजर  वय 39 रा मंगलमूर्ती रेसिडेन्सी शिवदर्शन कॉलनी गडकर आळी  यांना 1500 रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले ही कारवाई सोमवारी दुपारी दीड वाजता तलाठी कार्यालयाच्या परिसरात करण्यात आली.
या कारवाईने महसूल विभागात एकच खळबळ उडाली आहे गुजर याच्यावर मेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे तक्रार दार मूळ महिगाव येथील असून त्यांच्या मालकीच्या जमीनीचा मूळ एकोबा घेणे व त्यावर वारस दाराची नोंद करणे यासाठी त्यांनी महिगाव तलाठी सजा येथे अर्ज केला होता मात्र गुजर यांनी या कामासाठी दोन हजार रुपये लाचेची मागणी करून काम खोळंबून ठेवले.
गुजर याला पंचा समक्ष दोन हजार स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले  सोमवारपासूनच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा दक्षता सप्ताह सुरू झाला होता आणि त्याच दिवशी महिगावच्या तलाठयावर कारवाई झाली.