लोधवडे येथील सरस्वती पसंस्थेवर चोरट्यांचा दरोड्याचा प्रयत्न

म्हसवड : लोधवडे, ता. माण येथे रविवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यानी सरस्वती ग्रामीण बिगर शेती सहकारी पसंस्थेवर धाडसी दरोड्याचा प्रयत्न केला. या दरोड्याच्या तपासासाठी श्वान पथकाला पाचारण करण्यात आले होते मात्र पतसंस्थेच्या मागील बाजूने श्वान फिरून जागेवरच घुटमळत होत दरोडा यशस्वी होत नसल्याने दरोडेखोर आपले साहित्य तिथे टाकून पळाले.
लोधवडे येथे सरस्वती ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था गावाच्या मध्यभागी असून शेजारी सोसायटीचे कार्यालय आणि प्राथमिक मराठी शाळेसह अन्य लोक राहतात मुख्य रस्त्याकडे तोंड करून पतसंस्था कार्यालय आहे तर त्याच इमारतीत पाठी मागे पतसंस्थेच्या दक्षिण बाजूला रेशनिंग दुकान आहे हे रेशनिंग दुकान पतसंस्थाच चालवते.त्यापलीकडे ओढ्याचे पात्र असून त्यावर बंधारा आहे. काल नेहमी प्रमाणे कामकाज संपल्यावर कर्मचार्‍यांनी संस्था सायंकाळी बंद केली आणि सगळे घरी गेले.
आज सकाळी अचानक पाहिले असता रेशनिंग दुकानाचे दार उघड दिसलं त्यानंतर संस्थेच्या कर्मचार्‍यांना कळवण्यात आले त्यांनी पाहिले असता संस्थेत चोरी करण्याची घटना उघडकीस आली चोरट्यानी मध्यरात्री सुमारे बारा वाजण्याच्या नंतर रेशनिंग दुकानाच्या बाजूने कटावणीने दार उस्कुटून आत प्रवेश केला त्यानंतर रेशनिंग दुकानाचे दार लावून घेतले आत त्याच्या आतल्या दाराने पतसंस्थेत प्रवेश केला व संस्थेची तिजोरी फोडण्यासाठी त्यानी एक लहान सिलेंडर आणि एक मोठा सिलेंडर असे दोन सिलेंडर त्यासाठी लागणारे सगळे साहित्य अतिशय गोपनीय रित्या आत नेले तिजोरी ठेवलेल्या ठिकाणी जात त्या गॅस कटरच्या साहायाने तिजोरी वर काही ठिकाणी छेद घेण्यात आले आहेत मात्र खूप प्रयत्न करून सुध्दा तिजोरी चोरट्यना फुटली नाही अखेर दमलेल्या चोरट्यानी आपणा बरोबर आणलेल साहित्य जागीच ठेवून पलायन केले. ह्या वस्तू कदाचित दुचाकीवरून आणल्येल्या असाव्यात अशी चर्चा घटनास्थळी होती ही घटना पोलिसांना कळवण्यात आल्यावर या ठिकाणी म्हसवड आणि दहिवडी पोलीस लागलीच घटनास्थळी दाखल झाले त्याच बरोबर पोलीस उपअधीक्षक श्री चोपडे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री प्रकाश इंगळे यांनी देखील घटनास्थळी भेट दिली व लागलीच श्वान पथकाला पाचारण करण्यात आले घटनेची फिर्याद संस्थेचे व्यवस्थापक दाजीराम जगताप यांनी दिली त्यानुसार पोलिसांनी लागलीच  ठसे तज्ज्ञांच्या मदतीने काय मार्ग सापडतोय का तेही पाहिल श्वानाला घटनास्थळी सापडलेल्या वस्तूंचा वास दिला त्या द्वारे श्वान बाहेर येऊन काही ठिकाणी फिरले व जागेवरच घुटमळल या घटनेचा अधिक तपास बीट हवालदार तुपे करत आहेत.