म्हासुर्णेत ज्वेलर्स दुकानात चोरी ; शटर उचकटुन ज्वलर्स मधिल ऐवंज लंपास

पुसेसावळी:  खटाव तालुक्यातील म्हासुर्णे येथील मंगळवार पेठेतील वेदपाठक ज्वेलर्स रात्री १ ते २ सुमारास दुकान फोडुन अंदाजे अडीच लाखाचा ऐवज लंपास केला आहे,

म्हासुर्णे गावातील मंगळवार पेठेतील अक्षय वेदपाठक यांच्या मालकीची वेदपाठक ज्वेलर्सचे चोरट्यांनी शटर  उचकटुन दुकानात शिरकाव करुन सोने व चांदीचे अंदाजे अडीच लाखाचा ऐवज लंपास केला आहे ,या पेठेतील दुकान चोरी झाल्यामुळे व्यापारी वर्ग व ग्रामस्थ यांच्या मध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे ,

तसेच या गावात दुकाने व घरामध्ये या अगोदर चोर्‍या झाल्या असुन त्याचा अद्याप तपास लागला नाही तरी वेदपाठक ज्वलर्स चोरीच्या घटनेचा तरी तपास पोलीस यंत्रनेनी लावावा अशी मागणी ग्रामस्थांतुन होत आहे ,तरी या घटनेची नोंद मायणी पोलीस स्टेशनला झाली असुन अधिक तपास ए.पी.आय संतोष गोसावी करत आहेत.

रात्रगस्त घालण्याची मागणी : म्हासुर्णे गावात व परिसरात चोरीच्या घटना वारंवार घडत असल्याने नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.त्यामुळे पोलीसांनी रात्रीची गस्त घालावी,अत्यावश्यक ठिकाणी सीसीटीव्हि कँमेरे बसवण्यात यावेत अशी मागणी नागरिकामधुन होत आहे.