कराड येथील अल्पवयीन मुलीवर झालेल्या विनयभंग प्रकरणी संशयीत आरोपी अजय गवळीच्या आई व बहिणीची पोलिस चौकशी व्हावी.- प्रा. रविंद्र सोनावले.

 

पाटण, – कराड येथील अजय गवळीने केलेल्या अल्पवयीन मुलीवरील हल्ल्यातील संशयीत गवळीची आई व बहिण या गुन्ह्यातुन पोलिस कारवाई टाळण्यासाठी कांगावा करीत असुन मला बदनाम करण्यासाठी घाणेरडे आरोप करीत असल्याचा खुलासा रिपब्लीकन पक्षाच्या पश्चिम महाराष्ट्राचे सरचिटणीस प्रा. रविंद्र सोनवले यांनी येथील विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत केला. पोलिसांनी या घटनेतील संशयास्पद बाबींची सखोल चौकशी करुन सत्य बाहेर आणावे त्यासाठी मी चौकशीला सामोरे जाण्यास तयार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
४ नोहेंबर रोजी कराड येथील नराधम अजय गवळीने अल्पवयीन मुलीवर विनयभंग करुन हल्ला केला होता. मात्र ५ नोहेंबर रोजी तो बेशुद्धावस्थेत सापडल्यामुळे त्यास प्रथम कराड येथील खाजगी रुग्णालयात, सिव्हील हॉस्पीटल सातारा व पुढील उपचारासाठी ससुन हॉस्पीटल पुणे येथे दाखल केले होते. पुणे येथे कराड व पुणे पोलिस वेळोवेळी अजयचे जबाब घ्यायला गेले होते मात्र तो बेशुद्ध असल्याने डॉक्टरांनी पोलिसांना जबाब घेऊ दिले नव्हते.
ससुन हॉस्पीटल येथुन काही दिवसापुर्वी त्याला जबरदस्तीने पुणे येथील नातेवाईकांकडे उपचारादरम्यान नेले व पुन्हा दाखल केले होते. तो शुद्धीवर नसल्याने त्याचे जबाब घेण्यात आले नव्हते मग तो हॉस्पीटल मधे पत्र कसे लिहील, तो शुद्धीवर होता तर त्याने पोलिसांना का सांगितले नाही, स्वतःचा गुन्हा लपविण्यासाठी अवधी मिळावा यासाठी खोटे पुरावे गवळीची आई व बहिणीने नातेवाईकांच्या मदतीने गोळा करुण हा बनाव रचला आहे.
४ नोहेंबरला हल्ला झाल्यानंतर त्यामुलीवर कृष्णा रुग्णलयात उपचार चालु होते. त्या ठिकाणी मी होतो. तेथील सीसीटीव्ही फुटेज तपासले तर सर्व सत्य समोर येईल. एकुण झालेल्या घटनेचा सखोल तपास व्हावा पोलिसांच्या चौकशीला सामोरे जाण्यास मी तयार आहे असे शेवटी रविंद्र सोनवले यांनी सांगितले. यावेळी पाटण तालुका आरपीआय अध्यक्ष प्राणलाल माने, सामाजिक कार्यकर्ते विजय थोरवडे, आनंदा कांबळे, दिपक भोळे, बळीराम गायकवाड, संजय डुबल, अनिल माने आदी कार्यकर्ते उपस्थित होते.