राजू नलावडे उर्फ शेंबडा राजाची गळफास घेवून आत्महत्या

सातारा : सातारा शहरातील 439 मंगळवार पेठेतील रहिवाशी असलेला व पोलीस रेकॉर्डवरील उपद्रवी ठरलेला राजू उर्फ शेंबडा रामराव नलवडे (वय 52) याने गुरुवारी राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली आहे. या आत्महत्येचे कारण मात्र समजू शकलेले नाही. याबाबत शाहुपूरी पोलीस ठाण्यात राजू नलवडे याचा मुलगा अजित राजू नलवडे याने सायंकाळी उशीरा फिर्यात देण्याचे काम सुरुच होते. या घटनेचा तपास सपोनि भंडारे करीत आहेत.
दरम्यान, राजू उर्फ शेंबडा राजा याची हत्या की आत्महत्या याबाबत तर्कवितर्क केले जात असून त्याचा मृतदेह रात्री जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पोलीसांनी आणला होता. शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.