Friday, March 29, 2024
Homeठळक घडामोडीबेकायदेशीररित्या शस्त्र विक्री करणारी टोळी जेरबंद 

बेकायदेशीररित्या शस्त्र विक्री करणारी टोळी जेरबंद 

सातारा : दत्ता जाधवच्या टोळीतील जत जि.सांगलीमधील मोक्कामध्ये पाहिजे असलेल्या संशयित आरोपी सुरज उर्फ पप्पू घुले (वय 29, रा.गोडोली) याच्यासह आणखी दोघांना अटक करुन त्यांच्याकडून एकूण दोन गावठी पिस्टल व कार असा एकूण 6 लाख 45 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत पुसेगाव येथील दुकानादारालाही अटक करण्यात आली असून ही कारवाई सातारा एलसीबीने केली आहे. पोलिस अधीक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलिस अधीक्षक विजय पवार व पोलिस उपअधीक्षक गजानन राजमाने यांनी संयुक्तरित्या पत्रकार परिषदेत माहिती दिली.
बंदूकप्रकरणी सुरज उर्फ पप्पू भिमराव घुले (वय 29), नितीन भिमराव खरात (वय 26, रा.पुसेगाव) व विरधवल किरण देशमुख (वय 25, रा.खटाव) अशी अटक केलेल्या तिघांची नावे आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पुसेगाव येथे काही संशयितांकडे बंदूक असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषन विभागाला (एलसीबी) मिळाली. त्यानुसार पोलिसांच्या पथकाने पुसेगाव येथे सापळा रचला. संशयित स्कॉर्पिओ कारमधून फिरत असताना पोलिसांनी ताब्यात घेतले असता त्याच्याकडे एक बंदूक सापडली. पोलिसांनी त्याच्याकडे प्राथमिक चौकशी केल्यानंतर त्याने ती बंदूक पप्पू घुले याच्याकडून घेतल्याचे सांगितले. तसेच त्याने आणखी एक पिस्टल खटाव येथील हार्डवेअरचा दुकानदार विरधवल देशमुख याला विकले असल्याचे कबुली दिली. पोलिसांनी त्यानुसार विरधवल याला ताब्यात घेवून अटक केली.
एका संशयिताकडून माहिती मिळेल त्याप्रमाणे पोलिसांनी कारवाईला  सुरुवात केल्यानंतर पप्पू घुले याला ताब्यात घेण्यात आले. तो जत येथील पोलिस हल्ल्यात पाहिजे असलेला तसेच मोक्कामधील पाहिजे असलेला संशयित आरोपी असल्याचे समोर आले. यामुळे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले व त्याच्याकडे चौकशीला सुरुवात केली. यामध्ये पप्पू घुलेवर बारामती, सातारा शहर व जत  पोलिस ठाण्यात खून, खूनाचा प्रयत्न व मोक्कासारखे गंभीर गुन्हे दाखल असल्याचे समोर आले. ही सर्व लिंक एकच असल्याने व त्यांच्याकडे शस्त्रे सापडल्याने पोलिसांनी गुन्हा दाखल अटक केली व न्यायालयात हजर केेले असता त्यांना 10 तारखेपर्यंत पोलिस कोठडी मिळाली.
पोलिस अधीक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलिस अधीक्षक विजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि पद्माकर घनवट, पोनि किशोर धुमाळ, पोनि चंद्रकांत बेदरे, सपोनि विठ्ठल शेलार, फौजदार सागर गवसणे, पोलिस हवालदार पृथ्वीराज घोरपडे, विलास नागे, संजय पवार, मोहन नाचण, योगेश पोळ, राजकुमार ननावरे, संतोष जाधव, प्रवीण कडव, वैभव सावंत, मयुर देशमुख, संकेत माने, मारुती अडागळे, गणेश कचरे, प्रवीण गोरे, लैलेश फडतरे, संतोष लेंभे, श्रीनिवास देशमुख, अमित माने, स्वप्नील कुंभार, मोहन पवार, ओंकार यादव, धिरज बेचके, प्रिती माने यांनी कारवाईत सहभाग घेतला.
Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular