शिवसेनेच्या ग्राहक संरक्षण मंचच्या जिल्हाध्यक्षासह एका महिला पदाधिकाऱ्यावर खंडणीचा गुन्हा दाखल  

वडूज : ( वार्ताहर ) येथील डॉ विवेकानंद माने यांना दीड लाख रुपये मागणी करणाऱ्या शिवसेनेच्या ग्राहक संरक्षण मंचच्या जिल्हाध्यक्ष विश्वास किसनराव चव्हाण (रा. फलटण) याच्यासह शिवसेनेची महिला पदाधिकारी (नाव समजू शकले नाही) यांच्यावर  वडूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत डॉ माने यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार (दि ११) रोजी मी माझ्या चारुशीला हॉस्पिटल मध्ये ओ पी डी काम करीत असताना चार ते पाच अनोळखी पुरुष व एक महिला आली त्यांनतर त्यांनी मला त्यांच्या शिवसेनेच्या ग्राहक संरक्षण मंचच्या वतीने लेखी पत्र दिले. त्यात त्यांनी रंजना पाटील(देशमुख) रा. कुरोली ता खटाव यांचे तीन वर्षांपूर्वी खूब्याचे ऑपरेशन झाले होते. ते तुम्ही कृत्रिम सांधा टाकून केले होते. ते तुम्ही व्यवस्थित केले नव्हते. त्यामुळे तो कृत्रिम सांधा तुटून त्रास होत आहे असे त्या पत्रात लिहले होते.
दरम्यान मी या मध्ये ऑपरेशन चा काहीही दोष नसून तुमच्या मते पेशंट तीन वर्षे चालत होता तरी तो कृत्रिम सांधा तुटला असल्यास आपण ज्या कंपनीचा सांधा वापरला आहे त्या कंपनीला कळवूयात तसेच तुम्ही ऑपरेशन केलेली सर्व कागदपत्रे घेऊन या असे विश्वास चव्हाण याच्यासह सर्वाना सांगितले होते.
मात्र सोमवार दि.२५ रोजी सात ते आठ इसम व विश्वास चव्हाण, महिला पदाधिकारी माझ्या हॉस्पिटल मध्ये आले यावेळी त्यापैकी ते दोघे  म्हणाले तुम्ही ऑपरेशन का करू शकत नाही, ऑपरेशन केलंच पाहिजे नाहीतर तुमची बदनामी करतो आणि ती थांबवायची असेल तर आम्हाला  दिड लाख रुपये द्या नाहीतर आम्ही सेने स्टाईलने आक्रमक पवित्रा घेऊन तुम्हाला दाखवतो असे म्हणत महिला पदाधिकारी हिने तुमच्यावर कोणत्याही प्रकारची केस टाकून तुम्हाला अडकवू अशी धमकी दिली असल्याची फिर्याद वडूज पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. या गुन्ह्याचा तपास पो हवालदार ओंबासे करीत आहेत.