अक्षय कदमचा मृतदेह मिळाला रेल्वे रुळाजवळ ; अक्षयचा मृतदेह ताब्यात घेण्यास नातेवाईकांचा नकार

कोरेगाव : तांदूळवाडी, ता. कोरेगाव येथे रेल्वे फाटकानजीक कोल्हेश्वर विद्यालयासमोर अक्षय भाऊसाहेब कदम वय 22 रा. काशिळ कोपर्डे ता. जि. सातारा याचा मृतदेह रेल्वेरुळानजीक मिळून आला. कोरेगाव पोलीस ठाण्यात अपघात की अन्य कशाने मृत्यू झाला याची रात्री उशिरापर्यंत झाली नव्हती. अक्षय याचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी सातारा शासकीय रुग्णालयात आणण्यात आला आहे. जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत अक्षयचा मृतदेह ताब्यात घेणार नसल्याने सातारा शासकीय रुग्णालयात परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. संतप्त नातेवाइक घातपाता मुळेच अक्षयचा मृत्यू झाला असण्याच्या शक्यतेवर ठाम आहेत.
याबाबत समजलेली माहिती अशी की, अक्षय हा कुटुंबातील  एकुलता एक मुलगा होता. तो  रेल्वेच्या ठेकेदाराकडे कामाला होता. रेल्वे प्रशासना सह संबंधित ठेकेदार यांच्या कडुन हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. रेल्वे अपघातामध्ये अक्षय कदमचा मृत्यू झालेला नसुन तो संबंधित ठेकेदाराच्या डंपरमुळे झाला असण्याची शक्याता नातेवाईकानी बोलताना सांगितले आहे. कारण मयताच्या पायातील एक बुट डंपर खाली व दुसरा साठ फुटांपेक्षा ही लांब पडलेला दिसत होता. अक्षय याचा मृतदेह हा रेल्वे रुळानजीक त्याच्या नातेवाईकाना आढळुन आला. तसेच अपघाता दरम्यान त्याचा स्वताचा मोबाइल खोलीत असताना हेड फोन लावण्याचा प्रश्नच उदभवत नाही. पहाटे घडलेल्या अपघाताची खबर बारा वाजता मिळते यातच गडबड घोटाळा असून जिल्हा पोलिस प्रमुखांना घटनेची सविस्तर माहिती देण्यासाठी ग्रामस्थ सातारा येथे गेले असुन जो पर्यंत संशयीतावर गुन्हा दाखल हौत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचे नातेवाई कानी बोलताना सांगितले.