अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्या प्रकरणी संशयित आरोपी संतोष विचारे वर गुन्हा दाखल

पाटण:- पाटण तालुक्यातील कोयना विभागातील दुर्गम व डोंगराळ असणाऱ्या नाव या गावातील एका अल्पवयीन शाळकरी मुलीवर वारवांर बलात्कार झाल्याची घटना उजेडात आली आहे. या प्रकरणी मुलीचे पालक यांनी संसयीत आरोपी संतोष दाजी विचारे रा. नाव, सध्या रा. रामापूर ( पाटण ) याच्या विरोधात पाटण पोलिस स्टेशनला तक्रार दिली असून तसा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या बाबात आधिक माहिती सह पाटण पोलिसांत मुलिच्या पालकानी दिलेली तक्रार अशी संबधित मुलगी शिक्षणानिमीत्त पाटण येथे संतोष दाजी विचारे याच्या घरी रहात होती. तिच्या असहाय्यतेचा फायदा घेऊन संसयीत आरोपी संतोष विचारे याने १५ जुन २०१८ पासून ते २८ जुन २०१८ या कालावधीत संबधित मुलीवर लैगिंक अत्याचार केला आहे. अशी तक्रार तिच्या पालकांनी पाटण पोलिसांत दिली आहे. या बाबत पुढील तपास सुरू असून संसयीत आरोपी संतोष विचारे याला ताब्यात घेणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.