अल्पवयीन मुलीवर बलात्कार , कोयना पोलिसांकडून तपासात दीरंगाई

पाटण:- पाटण तालुक्यातील कोयना विभागातील दुर्गम व डोंगराळ असणाऱ्या नाव या गावातील एका अल्पवयीन शाळकरी मुलीवर बलात्कार झाल्याची घटना उजेडात आली आहे. कराड येथील कृष्णा रूग्णालयात अत्यवस्थेत उपचार घेणाऱ्या या अल्पवयीन मुलीच्या वतीने कृष्णा रूग्णालयातील तिच्यावर उपचार करणाऱ्या वैद्यकीय अधिका-यानी या प्रकरणी पोलीसात तक्रार दाखल केली आहे. कराड पोलीसांकडून ही तक्रार कोयना पोलीसात तपासासाठी वर्ग केली आहे. मात्र कोयना पोलीसांकडून या प्रकरणाच्या तपासला दीरंगाई होत असल्याने कोयना विभागातील नागरीकांकडून संताप व्यक्त होत असून एकच खळबळ माजली आहे. या प्रकरणातील संशयित आरोपी कडून या पाठीमागे अशी अनेक प्रकरणे झाली आहेत. त्याने अशा अपप्रव्रूतीमुळे लोंकांचा चोपही खाला आहे. आता त्याला शिक्षा झालीच पाहिजे अशी मागणी नागरीकांकडून होत आहे.
याबाबतचे सविस्तर वृत असे की कोयना विभागातील दुर्गम व डोंगराळ असणाऱ्या नाव या गावातील एक पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलगी पाटण येथील जवळच्या नातेवाईकांकडे शिक्षणासाठी राहत होती. मात्र स्वतःला प्रतिष्ठीत समजणाऱ्या या नातेवाईकाने मुलिच्या पालकांचा विश्वासघात करून या मुलीवर वेळोवेळी बलात्कार केला. गत दोन दिवसापासून तिची प्रक्रुती बिघडल्यामुळे तिच्या पालकांनी तिला कराड येथील कृष्णा रूग्णालयात उपचारांसाठी दाखल केले. उपचार सुरु असताना या अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाला असल्याचे डाँक्टरांच्या निर्दशनास आले. बलात्कार झाला असल्याचे मुलीनेही डाँक्टराजवळ कबुल केले आहे.
सध्या ती अल्पवयीन मुलगी अत्यवस्थ असून या धक्क्याने ती मनोरूग्ण झाली आहे. यामुळे तिच्यावर उपचार करणाऱ्या वैद्यकीय अधिका-यानी तिच्यावर अत्याचार झाला असल्याचे कराड येथील पोलीसात नमूद केले आहे. कराड पोलीसांकडून ही तक्रार कोयना पोलीसात नोंद झाली आहे. मात्र कोयना पोलीसाचां तपास संसयास्पद असल्याचे मुलीच्या नातेवाईकांकडून सांगण्यात येत आहे. या प्रकारामुळे कोयना विभागात एकच खळबळ माजली असून या प्रकरणातील आरोपीला तात्काळ अटक करून त्याच्यावर कारवाई करण्यात यावी. अशी मागणी समस्थ कोयना विभागातून होत आहे.