साताऱ्यात सायकल लपविण्याच्या कारणाने वेटरकडून स्थानिक तरुणाचा खून

 

सातारा दि : लॉक डाउन च्या तिसऱ्या हट्रिक मध्ये सातारा जिल्ह्यात दारू दुकाने उघडण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याचा अनपेक्षित निकाल पहिल्याच दिवशी बाहेर पडला असून एका युवकाला प्राण गमवावे लागले. सायकल लपविण्याच्या कारणाने खून झाला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.

याबाबत माहिती अशी की, बुधवार दि १३ मे रोजी सातारा जिल्ह्यातील दारू दुकाने उघडण्याचे आदेश जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिली. त्यामुळे मध्यपी व इतरांची दारू दुकानात झुबंड उडाली होती. सातारा -कोल्हापूर महामार्गावर असलेल्या वाढे ता .सातारा येथील वाढे फाट्यावरील साई ढाबा येथे वेटरचे काम पहाणारे तिघाजणांनी रांगेत उभे राहून दारू दुकानातून दारू विकत घेतली व शेजारील रानातील झाडा खाली पार्टी केली. दारूचा अंमल चांगलाच चढल्यानंतर वेटर दिपक विश्वनाथ दय्या वय -२९ रा.  वाढे फाटा मुळगाव – शिवाजी वाडी, भारत नगर, नाशिक याने सायकल लपविण्याच्या कारणातून वादीवाद केला व नंतर स्थानिक तरुण सुरज निगडे वय -३५ रा. वाढे याच्या डोक्यात भला मोठा दगड घालून खून केला. सदरची घटना सायंकाळी चार वाजता घडल्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग व सातारा तालूका पोलिस ठाण्याचे पो नि संजय हंकारे, पोलीस कर्मचारी दादा परिहार सुजीत भोसले यांनी घटना स्थळी जाऊन पंचनामा केला.  मृत्यूदेह  व दगड ताब्यात घेऊन शव विच्छेदन करण्यासाठी सातारा शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. तसेच आरोपी दिपक दय्या आला अटक करून सातारा न्यायालयाने घेऊन गेले.   अधिक तपासासाठी आरोपीकडे सखोल चौकशी करण्यात येणार असून खुनापर्यंत घटना घडत असल्याचे कारण काय?  याचा लवकरच उलगडा होणार आहे. आरोपीला पळून जाण्याची संधी न देता सातारा पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळ्याल्या आहेत.        दरम्यान, सातारा राष्ट्रीय महामार्गानजिक असलेल्या वाढे फाटा येथे  काही हॉटेल व ढाब्यावर जेवण करणार असेल तर दारू पिण्यासाठी सोय करण्यात येत असताना हे तिघे दारू पिण्यास रानात का गेले? या बाजून तपास करावा अशी मागणी होत आहे