सज्जन गडावर दै. ग्रामोध्दारच्या दासनवमी विशेषांकाचे प्रकाशन ; दै. ग्रामोध्दारच्या विशेषांकाला स्थान मिळाले समर्थांचे समाधीपुढे ; श्री रामदास स्वामी संस्थान व श्री समर्थं सेवा मंडळाकडून विशेषांकाचा गौरव

सातारा (अतुल देशपांडे यांजकडून) : येथील दै.ग्रामोध्दारने दासनवमी महोत्सवानिमित्त सलग पाचव्या वर्षी काढलेल्या सज्जनगड दासनवमी विशेषांकाचे प्रकाशन सज्जनगडावर श्री रामदास स्वामी संस्थानचे वतीने समर्थ रामदास स्वामींचे समाधीवर हा अंक ठेउन तसेच मान्यवरांचे हस्ते करण्यात आले. यावेळी संस्थानचे अध्यक्ष व अधिकारी स्वामी समर्थ वंशज भूषण स्वामी, बाळासाहेब स्वामी,  ज्येष्ठ समर्थ भक्त अजीत गोसावी,संस्थानचे व्यवस्थापक समथर्ं भक्त प्रकाश जोशी, समर्थं भक्त अभिजीत बुवा रामदासी, संस्थानचे पदाधिकारी, मानकरी व पुजारी आदी उपस्थित होते.
दै. ग्रामोध्दारचे वतीने प्रकाशित करण्यात आलेला सचित्र रंगीत वृत्तांत असणारा दासनवमी विशेषांक हा समर्थ रामदास स्वामींचे समाधी पुढे ठेउन रामनामाच्या जयजयकारात प्रकाशित करण्यात आला.
हाच विशेषांक समर्थं सेवा मंडळाचे श्रीराम भक्त निवासामध्ये श्रीराम पंचायतनापुढे समर्थ भक्त व मंडळाचे अध्यक्ष श्री गुरूनाथ महाराज कोटणीस, मार्गदर्शक रमेशबुवा शेबेंकर, विश्‍वस्त योगेश बुवा रामदासी, समर्थ भक्त अजेय देशपांडे, प्रतिक कोठावळे यांचे हस्ते प्रकाशित करण्यात आला, यावेळी मंडळाचे अध्यक्ष ह.भ.प. गुरुनाथ महाराज कोटणीस, सौ.रसिकाताई ताम्हणकर,अरविंदबुवा रामदासी,करमरकरबुवा रामदासी, मीनाताई देशपांडे, आदी मान्यवर उपस्थित होते.या विशेषांकाबद्दल आपले
मनोगत व्यक्त करताना संस्थानाचे अध्यक्ष भूषण स्वामी म्हणाले की, दै.ग्रामोध्दारने  या सर्व दासनवमी महोत्सवात होणारे दररोजचे शब्दरुप व चित्रमय वर्णन विशेषांकाद्वारे गेली 5 वर्षे प्रसिध्द केले आहे ही खरोखरच कौतुकाची बाब आहे.या अंकामुळे सज्जनगडावर उपस्थित असणार्‍या तसेच संपुर्ण जिल्हा तसेच इतर प्रांतातही या दासनवमीचा वृत्तांत अगदी रंगीत चित्रांसह पहायला व अनुभवायला मिळत आहे. याचे विशेष कौतुक वाटते. संस्थानच्या संकल्पित उपक्रमांचीही विशेष दाद समर्थभक्तांना सांगण्याचे कौतूकास्पद कार्य या विशेष अंकात प्रकाशित करण्यात आले. ही मोठी आनंदाची गोष्ट वाटते. दै. ग्रामेाध्दारच्या या यशस्वी व भावी वाटचालीस मी संस्थानचे वतीने शुभेच्छा देतो. या वेळी समथर्ं सेवा मंडळाचे मार्गदर्शक रमेश बुवा शेंबेकर म्हणाले की, दै.ग्रामोध्दारकडून प्रसिध्द केलेल्या या विशेषांकातुन सज्जनगडावरील विविध उपक्रमांना तसेच स्थळांना प्रसिध्दी मिळाली. हा अंक खरोखरच सर्वच समथर्ं भक्तांना जपून ठेवण्यासारखा व संग्राह्य असा आहे. याबद्दल मी ग्रामोध्दार परिवाराचे विशेष अभिनंदन करतो. या अंकाबद्दल मंडळाचे कार्यंवाह समर्थ भक्त मारुतीबुवा रामदासी यांनी समर्थ सदन मध्ये या विशेषांकाचे अवलोकन करुन समर्थांच्या विचारांना प्रसार व प्रसिध्दी देण्यात ग्रामोध्दारने नेहमीच सढळ स्थान दिले आहे. खर्‍या अर्थाने स्थानिक बातम्यांना व घडामोडींना प्राधान्य देण्यात दै.ग्रामोध्दार हा नावाप्रमाणेच आपले कार्य करत आहे.ग्रामेध्दार परिवाराची वाटचाल अशीच वृध्दींगत होवो. यावेळी दै.ग्रामोध्दारचे वृत्त संपादक अतुल देशपांडे,सुप्रसिध्द गायिका सौ. अपर्णा गुरव, तबला वादक मिलींद गुरव,टाळ वादक माउली टाकळकर, ध्वनी संयोजक सुभाष कुंभार आदी उपस्थित होते.
विशेषांकावर समर्थ भक्तांच्या उड्या 
दै. ग्रामोध्दारने प्रकाशित केलेला हा विशेषांकाचे प्रकाशन झाल्यावर समर्थ समाधी मंदिर परिसरात तसेच सेवा मंडळाचे भक्त निवास बाहेर हा संग्राह्य विशेषांक मोफत वितरीत करण्यात आला. हा अंक आपल्या जवळ  हवाच या अपेक्षेने अनेक आबाल वृध्दांनी यावेळी अंक मिळवण्यासाठी एकच गर्दी केली होती. तसेच समर्थ मधील दासबोध पारायण वाचकांनाही हा अंक मोफत वितरण करण्यात आला.