रविवारी सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय निबंध स्पर्धा पारितोषिक वितरण समारंभ,राज्यस्तरीय पत्रकार दिन व पहिल्या दर्पण वृत्तपत्राचा वर्धापनदिन सोहळा

रविवारी सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय निबंध स्पर्धा पारितोषिक वितरण समारंभ,राज्यस्तरीय पत्रकार दिन व पहिल्या दर्पण वृत्तपत्राचा वर्धापनदिन सोहळा
फलटण : महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीच्या वतीने पोंभुर्ले ग्रामस्थ व जांभेकर कुटुंबिय यांच्या सहकार्याने मराठी भाषेतील पहिल्या दर्पण वृत्तपत्राचा वर्धापनदिन म्हणजेच राज्यस्तरीय पत्रकार दिन व सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय निबंध स्पर्धा पारितोषिक वितरण समारंभ रविवार, दि.6 जानेवारी 2019 रोजी स.10:30 वाजता पोंभुर्ले, ता.देवगड, जि.सिंधुदुर्ग येथील दर्पण सभागृहात आयोजित केला आहे. हा कार्यक्रम ज्येष्ठ विचारवंत व साहित्यिक तथा ज्येष्ठ पत्रकार सुभाष धुमे (गडहिंग्लज, जि.कोल्हापूर) यांच्या हस्ते व महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे अध्यक्ष रविंद्र बेडकिहाळ यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. यावेळी प्रमुख पाहूणे म्हणून पत्रकार डॉ.ग.गो.जाधव चॅरिटेबल ट्रस्ट, कोल्हापूरच्या पत्रकारिता अभ्यासकेंद्राचे केंद्रप्रमुख अ‍ॅड.वसंत सप्रे, रत्नागिरी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राजाभाऊ लिमये उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती संस्थेचे कार्यकारी विश्‍वस्त विजय मांडके यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये दिली.
याबाबत सविस्तर माहिती देताना विजय मांडके यांनी सांगितले की, महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीच्यावतीने राज्यस्तरीय पत्रकार दिनानिमित्त दरवर्षी संस्थेच्या पोंभुर्ले (जि.सिंधुदुर्ग) येथील दर्पण सभागृहात बाळशास्त्री जांभेकरांना अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. यंदाच्या कार्यक्रमास पत्रकार डॉ.ग.गो.जाधव चॅरिटेबल ट्रस्ट, कोल्हापूरच्या पत्रकारिता अभ्यासकेंद्राचे विद्यार्थी उपस्थित राहणार आहेत. तसेच यावर्षी मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या कार्याची माहिती महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना व्हावी यासाठी दर्पणकारांच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी विशेष निबंध स्पर्धा यावर्षी संस्थेच्यावतीने आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेतील विजेत्यांचा पारितोषिक वितरण समारंभ यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. या स्पर्धेतील विजेते पुढील प्रमाणे – प्रथम क्रमांक कु.काजल मंगेश सावंत (संत राऊळ महाराज महाविद्यालय, कुडाळ), द्वितीय क्रमांक (विभागून) कु.अनघा प्रकाश पंडित (श्री.स.ह.केळकर महाविद्यालय, देवगड) व कु.प्रणाली प्रकाश पांचाळ (कला व वाणिज्य महाविद्यालय, खारेपाटण), तृतीय क्रमांक कु.शारमिन तकदीर डोंगरकर (कला व वाणिज्य महाविद्यालय, खारेपाटण), चतुर्थ क्रमांक कु.प्रियांका श्रीकृष्ण कुंभार (संत राऊळ महाराज महाविद्यालय, कुडाळ), पाचवा क्रमांक कु.प्रणाली प्रसाद पवार (श्रीमती न.शां.पंतवालावलकर कनिष्ठ महाविद्यालय, देवगड).
दर्पणकारांच्या जन्मभूमीत त्यांच्याच दर्पण स्मारक सभागृहात आयोजित केलेल्या या ऐतिहासिक कार्यक्रमास व दर्पणकारांना अभिवादन करुन आदरांजली वाहण्यासाठी पोंभुर्ले परिसरातील ग्रामस्थ, विविध क्षेत्रातील मान्यवर, पत्रकार, प्राध्यापक, शिक्षक, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी व वृत्तपत्रप्रेमी नागरिकांनी अगत्याने उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थेचे उपाध्यक्ष बापूसाहेब जाधव व कृष्णा शेवडीकर, विश्‍वस्त सुहास रत्नपारखी, अमर शेंडे, रोहित वाकडे, पोंभुर्ले ग्रामपंचायतीचे नूतन सरपंच सादिक डोंगरकर, मधुकर व सुधाकर जांभेकर, शांताराम गुरव, जांभे – देऊळवाडी ग्रामस्थ यांनी केले आहे.