सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या चोराडे शाखेतुन शेतकर्‍यांस थेट कर्ज योजनेतुन जे.सी.बी.साठी कर्जवाटप

म्हासुर्णे :(प्रतिनिधी तुषार माने ) सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्यावतीने शेतकर्‍यांना थेट कर्ज योजनेतुन विविध प्रकारची व्यवसायिक कर्जे घेता येतील यासाठी या योजनेचा लाभ घेणे गरजेचे असल्याचे मत यांनी बॅकेचे सरव्यवस्थापक एस.एन.जाधव यांनी मांडले,

ते चोराडे (ता.खटाव) येथील थेट कर्ज वाटप योजनेतुन जे.सी.बी चा धनादेश देताना बोलत होते,
यावेळी विभागिय विकास अधिकारी यु.के.देशमुख फर्निचर विभाग व्ही.व्ही.राजुरकर, विक्री अधिकारी एस.आर.खाडे, विकास अधिकारी जे.वाय.गोडसे,विकास अधिकारी अार.एम .राऊत, शाखाप्रमुख पी.आर.जाधव, मा.सरपंच विठोबा पिसाळ,मा.चेअरमन हणमंत पिसाळ,ग्रामपंचायत सदस्य श्रीकांत पिसाळ,सचिव संजय पिसाळ, सचिव विजय पिसाळ आदींची प्रमुख उपस्थित होती,
ते पुढे म्हणाले की चोराडेतील शाखेमार्फत शेतकर्‍यांच्या हिताचे निर्णय घेतले जातील तसेच या शाखेतुन शेतकर्‍यांना कर्जपुरवठा केला जाईल, शेतीपुरक व्यवसायांना आर्थिक कर्जपुरवठा करण्यात येईल,
यावेळी बॅकसेवक पी.एस.वाघमोडे, डाॅ.तानाजी कोळेकर सुनिल जानकर, तेजस कोळेकर,संजय पिसाळ, सचिव संजय कुकले, अंकुश पिसाळ, शामराव पिसाळ, आण्णासो पिसाळ, भिमराव पिसाळ, संजय चव्हाण,महेश पिसाळ
आदी ग्रामस्थ व खातेदार उपस्थित होते.