Friday, March 29, 2024
Homeठळक घडामोडी‘करोना’च्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्हा बँकेमार्फत ज्येष्ठ नागरिकांना बँक सेवकांमार्फत घरपोहोच पेन्शन...

‘करोना’च्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्हा बँकेमार्फत ज्येष्ठ नागरिकांना बँक सेवकांमार्फत घरपोहोच पेन्शन रक्कम दिली जाणार :- मा. आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले

 

सातारा :- बँकेच्या शाखा व विस्तारित कक्ष ज्या शहरे व गावात आहेत त्या शहरे व गावामधील ज्येष्ठ नागरिक आणि संजय गांधी निराधार पेन्शनर ग्राहकांना बँक सेवकांमार्फत त्या ग्राहकांच्या बँक खात्यावरील शिल्लक रक्कमेमधून घरपोहोच पेन्शन व अन्य रक्कम दिली जाणार असलेचे बंकेचे अध्यक्ष, मा. आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी कळविले आहे.
सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक जिल्ह्यामध्ये ३२० शाखांच्या माध्यमातून शहरी व ग्रामीण भागातील अंतिम घटकापर्यंत कोअर बँकिंग प्रणालीद्वारे तत्पर व जलद सेवा अखंडपणे देत आहे. कोरोन व्हायरस (कोविड१९) मुळे अवघा देश टाळेबंदित झालेला आहे. त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र व महाराष्ट्र शासन युद्ध पातळीवर काम करत आहे. अत्यावश्यक सेवा सुरु असून यामध्ये बँकिंग क्षेत्राचा महत्त्वपूर्ण वाटा आहे.
बँक शाखांमध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. यावर जिल्हा बँकेच्या वतीने विविध प्रभावी उपाययोजना केल्या आहेत. शाखा स्तरावर दैनंदिन व्यवहारासाठी ग्राहकांची अनावश्यक गर्दी टाळणेसाठी शाखा कार्यक्षेत्रातील प्रत्येक गावास / वाडीस तसेच शहरातील प्रत्येक वार्ड येथील बँकेच्या ग्राहकांकरिता आठवड्यातील वार ठरवून दिलेले आहेत. या करिता ग्रामपंचायत सरपंच/ उपसरपंच/ विकास सेवा सोसायटी/पोलीस पाटील यांचे सहकार्याने कामकाज सुरु ठेवणेबाबत मुख्य कार्यालयामार्फत सूचना केल्या आहेत. यानुसार शाखांमधील कामकाज सुरळीत पार पडले जात आहे. याकरिता पोलीस व स्थानिक नागरिक यांचेकडून सहकार्य मिळत आहे. ग्राहकांना शाखेत येताना हँड वॉश, सनीटायझरचा पुरवठा केलेला आहे. शाखेमध्ये सामाजिक अंतर ठेऊन एका वेळी एकाच ग्राहकाला प्रवेश दिला जात आहे .
ज्या ठिकाणी बँकिंग सुविधा उपलब्ध नाहीत त्या ठिकाणी मोबाईल एटीएम व्हँनचे माध्यमातून ग्राहकांना बँकिंग सेवा उपलब्ध करून दिली जात आहे.
सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेने कोरोनना व्हायरस (कोविड १९) प्रादुर्भाव रोखण्यासाठी वरीलप्रमाणे केलेल्या उपाय योजनांप्रमाणे ग्राहकांनी सहकार्य करून अनावश्यक गर्दी टाळावी असे आवाहन बँकेचे अध्यक्ष मा. आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे यांनी केले आहे .

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular