Friday, March 29, 2024
Homeठळक घडामोडीकवडेवाडी येथील पूल लवकरात लवकर दुरूस्त करण्याची ग्रामस्थांची मागणी

कवडेवाडी येथील पूल लवकरात लवकर दुरूस्त करण्याची ग्रामस्थांची मागणी

वाठार स्टेशन : परतीच्या पावसामध्ये कवडेवाडी ता:कोरेगाव येथील वांगना नदीवरील पूल 14 ऑक्टोबर रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे वाहून गेला होता या पुलावरूनच कवडेवाडी ग्रामस्थ व पंचक्रोशीतील नागरिक ये-जा करत असतात हा पूल तालुक्याला जोडणारा असल्याने येथील ग्रामस्थांना तालुक्याच्या ठिकाणी जाण्यासाठी हिवरे किंवा भाडळे या लांबवरच्या मार्गाचा वापर करावा लागत आहे.कवडेवाडी ग्रामस्थांचे दिनमान पूर्णपणे विस्कळीत झाले आहे.
कवडेवाडी ग्रामस्थ व ग्रामपंचायत या दोहोंच्या समन्वयातून वाहून गेलेल्या पुलाच्या बाजूने पर्यायी वाहतूक व्यवस्था करण्याचे काम चालू आहे. यामध्ये मुरूम टाकून रस्ता तयार करण्याचे काम चालू आहे. परंतू यासाठी लागणारा पैसा फारच तोकडा असल्याने जि. प.सदस्य व प.स.सदस्य यांनी लवकरात लवकर आपत्कालीन निधीची मागणी करून अथवा आपल्या स्वतःच्या फंडातून हे काम मार्गी लावून कवडेवाडी ग्रामस्थांची होणारी ससेहोलपट थांबवावी. नुकताच तहसीलदार स्मिता पवार यांनी या पुलाची पाहणी करून तसे आदेशही दिले होते .प.स.कोरेगाव शाखा अभियंता पाटील यांनी या पुलाचा आढावा घेतला परंतू पुन्हा कोणत्याही हालचाली शासनदरबारी झालेल्या दिसत नाहीत मात्र कवडेवाडी ग्रामस्थ यांचे मोठे हाल पहावयास मिळत आहेत.नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झालेले आहे त्याचप्रमाणे जि. प.सदस्य व प.स.सदस्य यांनी या पुलासाठी हालचाली वेगवान करून हा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावावा अशी मागणी कवडेवाडी ग्रामस्थ ,सरपंच, उपसरपंच करत आहेत.
कवडेवाडी ग्रामस्थांनी आपली थकीत देणी लवकरात लवकर ग्रामपंचायतीकडे सुपूर्त करावी.ग्रामपंचायतीची वसूली शंभर टक्के पूर्ण झाल्यास स्वावलंबनातून या सुरू असणार्‍या पर्यायी मार्गासाठी निधी ग्रामपंचायतीकडे उपलब्ध होवू शकतो व कवडेवाडी ग्रामस्थांचे व पंचक्रोशीतील नागरिकांचे विस्कळीत झालेले जनजीवन सुरळीत होण्यास मदत होवू शकते असे प्रतिपादन कवडेवाडी ग्रामसचिव ए. जे. शेख यांनी केले आहे.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular