Friday, April 19, 2024
Homeसातारा जिल्हापाटणसमाजसेवक योगेश पाटणकर यांच्याकडून पाटण तालुक्यातील पत्रकारांना जीवनावश्यक साहित्य वाटप ; कोरोनाच्या...

समाजसेवक योगेश पाटणकर यांच्याकडून पाटण तालुक्यातील पत्रकारांना जीवनावश्यक साहित्य वाटप ; कोरोनाच्या संकटात घेतली पत्रकारांची काळजी

 

पाटण:- (शंकर मोहिते) – कोरोनाच्या वाढत्या प्रार्श्वभुमिवर डॉक्टर्स, नर्स, सफाई कामगार, पोलिस यंत्रणा अत्यावश्यक यंत्रणेतील प्रशासनाबरोबर समाजातील घटक असलेला पत्रकार देखील जीवावर उध्दार होऊन कोरोना संदर्भातील अपडेट्स सर्व बातम्या घरात अडकून पडलेल्या नागरिकां पासून ते अत्यावश्यक सेवेतील अधिकारी – कर्मचारी यांच्यापर्यंत निस्वार्थी भावनेने पाठवत आहे. अशा परस्थितीत सर्व पत्रकारांची परस्थिती सारखी आहे. असे सांगता येत नसताना अशावेळी पत्रकारांना मायेचा आधार देत समाजसेवक युवा उध्दोजक योगेश पाटणकर यांनी पाटण तालुका संघातील सर्व सदस्यांना जीवनावश्यक किटस् बरोबर सेनिटायझर, मास्क चे वाटप केले.
योगेश पाटणकर यांच्या दात्रुत्वाचे पत्रकार संघाने आभार मानले.

कोरोनाचे महाभयंकर संकट देशावर पसरत असताना महाराष्ट्रात हा कोरोना आघाडीवर आहे. या संकटावर मात करण्यासाठी आरोग्य, पोलीस, अत्यावश्यक सेवेतील प्रशासन यंत्रणा अहोरात्र झटत असताना पत्रकार ही जिवावर उध्दार होऊन सामाजिक बांधिलकी जपत कोरोनाच्या युध्दातील सर्व अपडेट्स बातम्या समाजातील तळागाळा पर्यंत पोहचवत आहे. डोंगर दुर्गम पाटण तालुक्यातील पत्रकार या मागे राहिलेला नाही. आरोग्य विभाग, पोलीस यंत्रणा, प्रशासकीय यंत्रणेबरोबर सामाजिक कर्तव्य समजून निस्वार्थीपणे काम करत आहे. ग्रामीण भागातील पत्रकारांना मिडिया माध्यमातून पगार अथवा मानधन मिळतेच असे नाही. अशा परस्थितीत कौटुंबिक अडचणी संभाळून पत्रकारांना सामाजिक बांधिलकी जपून पत्रकारिता करावी लागते. अशावेळी पत्रकारांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. हे कोणीच जाणत नाही हे दुर्दैव आहे. “पत्रकार सर्वांसाठी असतो.. मात्र पत्रकारांसाठी कोणी नसतो” हि म्हण मागे सारत मुंबईस्थित पाटण तालुक्यातील उध्दोजक व समाजसेवक योगेश पाटणकर यांनी संकटसमयी पाटण तालुका पत्रकार संघातील पत्रकारांना मायेचा आधार देत जिवनावश्यक किटस् बरोबर सेनिटायझर, मास्क चे वाटप केले. योगेश पाटणकर यांच्या दात्रुत्वाचे पत्रकार संघाचे अध्यक्ष विलासराव माने, कार्याध्यक्ष विक्रांत कांबळे, उपाध्यक्ष योगेश हिरवे, जयभीम कांबळे सर्व पदाधिकारी सदस्य यांनी आभार मानले.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular