जिल्हास्तरीय लोकशाही दिन : तीन अर्ज प्राप्त

सातारा : जिल्हास्तरीय लोकशाही दिन जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल  यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. या जिल्हास्तरीय लोकशाही दिनामध्ये आज तीन तक्रारी जनतेकडून प्राप्त   झाल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित केलेल्या लोकशाही दिनास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे,  पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.  जिल्हास्तरीय लोकशाही दिनामध्ये प्राप्त झालेल्या अर्जामध्ये जिल्हा परिषद विभागाकडील-2 व नगरपालिकेकडील -1  अशा एकूण 3   तक्रार अर्जांचा समावेश आहे.