आई वडीलांच्या खस्ता विसरू नका तरच भविष्य दिसेल :- पो.उपनिरीक्षक गोतपागर          

पाटण:-   सध्या समाजात विचित्र प्रकार घडू लागले असून नाती-गोती एकत्र राहिली नाहीत तर स्वतःचा मुलगा आई-वडिलांना व्यवस्थित सांभाळ करत नसून विद्यालय असो किंवा महाविद्यालय असो यामधील लहान लहान मुले – मुली किंवा तरुण – तरूणी खोट्या प्रेमाच्या जाळ्यात अडकून आपले आयुष्य देशोधाडिस लावत असून या अपपरुव्तीच्या तरुण-तरूणीच्या मुळे कुटुंबच्या कुटुंब उध्वस्त होत आहेत म्हणूनच आपल्या आई-वडिलांनी आपल्यासाठी भूतकाळात काय केले आहे. काय खस्ता खाल्या आहेत हे विसरू नये तरच भविष्य काळ चांगले दिवस दिसतील  असे प्रतिपादन पाटण पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस उपनिरीक्षक व निर्भया पथकाचे प्रमुख श्री.कैलास गोतपागर यांनी केले ते पाटण पोलिस स्ठेशनच्या वतीने मोरणा विद्यालय व  ज्युनीयर कॉलेज मोरगिरी या ठिकाणी आयोजित केलेल्या मार्गदर्शन कार्यक्रमात बोलत होते यावेळी मोरणा विद्यालयाचे पर्यवेक्षक
श्री.व्ही.जी.पवार,दिनकर माथने,मनोहर यादव यांची प्रमुख उपस्थिती होती तर गोतपागर पुढे म्हणाले की कोल्हापूर परीक्षेत्राचे महानिरीक्षक विश्वास नांगरे -पाटील यांनी २०१६ मधे स्थापण केलेले निर्भया पथकाच्या माध्यमातून आमचे पोलिस खाते छेडचाड प्रकरणे असो किंवा मुलींच्या महीलांच्या संकटकाळी कायम जागरूक आहे परंतु हे कायमचे थांबवयाचे असेल तर मात्र  विद्यार्थ्याने शालेय शिक्षण घेत असताना विनयतेणे घ्यावे समाजात वाईट होत असलेल्या घटनेना मोडिस काडुन आपला देशाला , आपल्या महाराष्ट्राला , जशी आदर्श तरुणांची गरज आहे असे आपण व्हावे म्हणजे या सर्व वाईट अपपर्वुती थांबतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला यावेळी मोरणा विद्यालयाचे पी.पी.पाटील,संदिप भोळे इतर शिक्षक व शिक्षिका तसेच ज्युनीयर कॉलेजचे प्राध्यापक,प्राध्यापिका तसेच विद्यार्थी,विद्यार्थिनी उपस्थित होत्या. मानले.

:-  “प्रेम हे वासनेपोटी नसावे”  खर तर प्रेम हे आईने मुलांवर करावे,बहिणीने भावावर करावे,पत्नीने पतिवर प्रेम करावे परंतु समाजात आजच्या युगात प्रेमाचा वेगळा अर्थ काढून तरुण पिढी भरकटत जात आहे.यातून तरुण पिढी सावरण्यासाठी समाजात कोणीही प्रेम हे वासनेपोटी करू नये असे आवाहन मोरणा विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री.व्ही.जी.पवार यांनी केले ”