मुख्यमंत्र्यांची भूमिका म्हणजे धार्मिक हुकुमशाही : भारत पाटणकर यांची टीका

 चंद्रकांत पाटलांनी मराठा समाजाची माफी मागावी
सातारा : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नरेंद्र महाराज यांची भेट घेतल्यानंतर केलेले वक्तव्य म्हणजे लोकशाहीला झुगारुन केलेला प्रकार आहे. त्यांनी एकतर आपले वाक्य परत घ्यावे, राजीनामा द्यावा हाच त्यावर शालीन असा उपाय आहे. धर्मसत्ता महत्वाचे असल्याचे सांगून मुख्यंमत्र्यांनी आपली भूमिकाही धार्मिक हुकुमशहाफची असल्याचे स्पष्ट केले आहे. तुम्हाला आता माफी नाही, असा थेट आरोप श्रमिक मुक्ती दलाफचे अध्यक्ष तथा राष्ट्रीय संघटक डॉ. भारत पाटणकर यांनी सातारा येथे पत्रकार परिषदेत केला. दरम्यान, राज्य शासनाने ईबीसी सवलतीबाबत घेतलेल्या निर्णयानंतर मराठा समाजाने सरकारचे आभार मानले पाहिजेत, असे वक्तव्य महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले होते. त्याचाही समाचार डॉ. पाटणकर यांनी घेतला असून त्यांनी सकल मराठा समाजाची माफी मागावी, असेही म्हटले आहे.
डॉ. पाटणकर यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत सकल मराठा क्रांती मूक मोर्चा, ईबीसी सवलत, पाटण येथील रावसाहेब कसबे, प्रज्ञा पवार माफी प्रकरण आणि नाशिक येथील घटना त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांची नाणीज भेट यावर भाष्य केले. ते म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी नाणीजच्या भेटीमध्ये जे वक्तव्य केले त्यातून ते धार्मिक हुकुमशहा असल्याचाच अर्थ निघतो. त्यातून दुसरा अर्थ निघूच शकत नाही. जे स्वत: धर्म मानतात त्यांनी लोकशाही व्यवस्थेवर भाष्यच करायला नको. त्यांनी स्वत: आत्मक्लेष करावा आणि आपले विधान परत घ्यावे. तुम्हाला आता माफी नाही. तुम्ही समाजाची माफी मागितलीच पाहिजे.फ
डॉ. पाटणकर यांनी सकल मराठा क्रांती मूक मोर्चाफच्या मागण्यांविषयी आपली भूमिका मांडली. ते म्हणाले, मराठा क्रांती मूक मोर्चाच्या मागणीविषयी त्यांच्या प्रतिनिधींना पाठवून वेगवेगळ्या जिल्ह्यातील विविध कार्यकर्त्यांशी बोलण्याची प्रक्रिया लोकशाही विरोधी आणि वेळकाढूपणाची आहे. मराठा क्रांती मूक मोर्चा प्रक्रियेत कोणी नेतृत्व करत नाही आणि सरकारच्या प्रतिनिधींशी बालायला सकल मराठा समाजाने कोणाला अधिकारही दिलेले नाहीत. त्यामुळे या तजहेच्या चर्चा काढून अंदाज काढण्यालाही अर्थ नाही. उलट अशी प्रक्रिया सरकारने घडवून आणणे म्हणजे समाजाने घेतलेल्या निर्णयाला खो घालण्याचा प्रकार आहे. त्याचबरोबर ज्या मागण्या लेखी दिल्या आहेत त्याबद्दलचा लेखी प्रस्ताव तयार करून त्यांनी महाराष्ट्रभर प्रसारित करावा, जाहीर करावा. त्यावर संपूर्ण मराठा समाज लोकशाही पध्दतीने प्रक्रिया देईल. आरक्षण कसे देणार, त्याबाबत काय भूमिका आहे, यावरही सरकारचे भाष्य नाही. कोपर्डी प्रकरणानंतर शासनाची भूमिका काय आहे, यावर श्वेतपत्रिका काढायला हवी होती. अ‍ॅट्रॉसिटीमध्ये बदल करण्यात यावेत त्याचबरोबर खोट्या केसेस होवू नयेत यासाठी विशेष तरतूद करण्यात यावी.फ
डॉ. पाटणकर यांनी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावरही टीका केली. मराठा मोर्चामध्ये नेते मागे आणि समाज पुढे आहे, ही बाब त्यांनी लक्षात घ्यायला हवी, असे सांगून डॉ. पाटणकर म्हणाले, मंत्री पाटील कुणबी मराठा आहेत. त्यामुळे त्यांनी ईबीसी सवलतीच्या निर्णयानंतर आपली भूमिका अशाप्रकारे मांडायला नको होती. आपण सरकारमध्ये आहात आणि सरकार म्हणजे मालक नाही आणि तुम्ही सुध्दा मराठा समाजाचे मालक असल्यासारखे वागू नका. मराठा क्रांती मूक मोर्चाफनंतर काही घटक वातावरण दुषित करत आहेत. काही मंडळी समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. हे रोखण्यासाठी आम्ही मराठा समाजातील आर्थिकदृष्ट्या वंचित वर्ग आणि इतर समाजातील शोषित युवकांसाठी पुण्यामध्ये परिषद आयोजित केली आहे.
नाशिक येथील घटनेच्या अनुषंगाने डॉ. पाटणकर यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांच्यावरही टीका केली. ते म्हणाले, नाशिक येथील घटनेनंतर झालेल्या जाळपोळीत आणि अत्याचार प्रकरणात जे काही घडले त्या गुंडांमध्ये आपल्याच भाजपचे कार्यकर्ते सापडले आहेत. आपले कार्यकर्ते भानगडी करत आहेत. ज्या काही भानगडी झाल्या त्यामुळे समाज अस्वस्थ आहे. त्यामुळे असे काही करून तुम्हाला आणखी नाशिक घडवायचे आहेत का, असा आमचा प्रश्न आहे. नाशिकमधील जाळपोळीत भाजपचे जे गुंड कार्यकर्ते सापडले आहेत त्याबाबत मुख्यमंत्र्यांनी माफी मागावी आणि कार्यकर्त्यांना पक्षातून काढून टाकण्याबाबतचा निर्णय घ्यावा, अशी मागणीही डॉ. भारत पाटणकर यांनी केली.फ
चौकट करणे
व्यंगचित्र प्रकरणात स्वाभिमान कुठे हरवला होता..?

 

पाटण येथील विभागीय मराठी साहित्य संमेलनात जो काही प्रकार घडला त्या अनुषंगाने डॉ. भारत पाटणकर यांनी महाराष्ट्र साहित्य परिषदेची बोटचेपी भूमिका कारणीभूत असल्याचा ठपका ठेवला तर संबंधित प्रकाराच्या अनुषंगाने पोलीस केस करण्याची तत्परता दाखविणारे पाटणचे आमदार शंभूराज देसाई यांचा सामनाफमध्ये छापून आलेल्या आक्षेपार्ह व्यंगचित्रानंतर स्वाभिमान कुठे हरपला होता, असा सवालही केला आहे. ते म्हणाले, आपणास दुसरे कोणी आमदार करेल, याची शाश्वती नाही त्यामुळेच तुम्हाला आमदार होण्यासाठी शिवसेना लागते हे आम्ही मान्य करतो. मात्र, पाटणच्या साहित्य संमेलनानंतर मराठा क्रांती मोर्चाला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरु आहे. आपण सवंग लोकप्रियतेसाठी काही तरी करत आहात. मराठा समाजाची बदनामी करणाजया आक्षेपार्ह व्यंगचित्रानंतर आपण काहीच बोलला नाही. त्यावेळी तुमचा स्वाभिमान कुठे होता. आपले हे वागणे बरे नाही. तुम्ही आत्मपरिक्षण करा, असा सल्लाही डॉ. पाटणकर यांनी आ. देसाई यांना दिला.