वाईच्या द्रविड हायस्कूलला सांघिक विजेतेपदाचा मान

साताराः येथील दातार शेंदूरे इंग्लिश स्कूलच्या कोटेश्‍वर मैदानावर डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या वतीने संपन्न झालेल्या आंतरशालेय कबड्डी व खो खो स्पर्धेत सांघिक विजेतेपदाचा मान वाई येथील द्रविड हायस्कूलने मिळवला. या स्पर्धेत संस्थेच्या विविध शाळंातील मुलांनी कबड्डी व खो-खो क्रिडा स्पर्धेत आपले नैपुण्य दाखवले यामध्ये कबड्डीसाठी मुलांच्या 12 तर मुलींच्या 6 आणि खो खो साठी मुलांच्या 10 तर मुलींच्या 6 संघाचा समावेश होता. संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष शरद कुंटे यांच्या संकल्पनेतून या स्पर्धा प्रथमच घेण्यात आल्या. या स्पर्धेत पुणे, सांगली, वाई व सातारा येथून संघ सहभागी झाले होते.
या स्पर्धेत खो खो क्रिडा प्रकारात मुलांच्या गटात पुणे येथील न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग संघाने तर मुलींमध्ये पुण्याच्या अहिल्यादेवी गर्ल्स हायस्कूलने विजेतेपदाचा मान मिळवला. उपविजेते पदासाठी पुण्याचा गोळवलकर गुरूजी विद्यालय संघाचा मुलांचा तर याच शाळेच्या मुलींनी उपविजेतेपद मिळवले. कबड्डी क्रिडा प्रकारात पुणे येथील अहिल्यादेवी गर्ल्स हायस्कूलने मुलींच्या संघात तर वाई येथील द्रविड हायस्कूलच्या मुलांच्या संघाने विजेतेपद मिळवले. उपविजेते पदासाठी मुलींचा पिंपरी पुणे येथील एचएस स्कूल तर मुलांचा सांगली येथील कांतीलाल पुरूषोत्तम शाह प्रशाला इंग्रजी माध्यम या संघाने मिळवला. शिस्तबध्द संघ म्हणून मुलींसाठी सातारच्या दातार शेंदूरे इंग्लिश मिडीयम स्कूलची तर मुलांमध्ये टिळकरोड पुणे येथील न्यू इंग्लिश स्कूल संघाची निवड झाली. खो-खो साठी उत्कृष्ट तथा अष्टपैलू खेळाडू म्हणून मुलींमध्ये पुण्याच्या अहिल्यादेवी गर्ल्स हायस्कूलची पल्लवी शिंदे तर मुलांमध्ये रमणबाग पुण्याच्या न्यू इंग्लिश स्कूलचा शिवराज सुरूंगकर याची निवड झाली. कबड्डीसाठी अष्टपैलू खेळाडूत मुलींमध्ये पुण्याच्या अहिल्यादेवी गर्ल्स हायस्कूलची कु. तृषा जौजट तर मुलांमध्ये वाईच्या द्रविड हायस्कूलच्या अभिषेक शिंदे याची निवड झाली.
स्पर्धेचा बक्षिस समारंभ अर्जुन पुरस्कार विजेत्या शकुंतला खटावकर व सातारचे सहाय्यक क्रिडा अधिकारी बळवंत बाबर यांचे हस्ते संपन्न झाला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थेचे क्रिडाप्रमुख खेमराज रणपिसे हे होते. याप्रसंगी संस्थेचे कार्यवाह डॉ. श्रीकृष्ण कानेटकर, संस्थेचे आजीव सदस्य नागेश मोने,संस्थेचे सदस्य अनंत जोशी ,दातार शेंदूरे शाळेच्या मुख्याध्यापिका शबनम तरडे यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.
प्रमुख पाहुण्या शकुंतला खटावकर यांनी सर्व विजेत्या संघाचे अभिनंदन करून स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्वच खेळाडूंना भविष्यात चांगला खेळ करून नाव कमवा अशा शब्दंात शुभेच्छा दिल्या.
क्रिडा अधिकारी बळवंत बाबर यांनी संस्थेच्या या क्रिडा विषयक उपक्रमाचे कौतूक करून या मैदानी खेळातून भावी पिढीसाठी चांगले आरोग्यदायी जीवन तसेच खेळाडू निर्माण होतील यासाठी सातत्याने या खेळांना प्रोत्साहन द्या असे आवाहन केले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कु. प्रियांका सकुंडे व राजश्री चव्हाण यांनी केले. उपस्थित पाहुण्यांचा परिचय अमोल कदम यांनी करून दिला. तर आभार क्रिडा शिक्षिका सोनाली लेवे यांनी मानले. या स्पर्धाच्या यशस्वी संयोजनासाठी संस्थानियामक परिषद सदस्य अमित कुलकर्णी, डॉ.मधुसूदन मुजूमदार, संस्थेचे क्रिडा समिती सदस्य श्री आमरोळे, श्री सोनावणे, तांत्रिक सहाय्यक मयुर घोरपडे, महेंेद्र गाढवे, अमोल कदम, सुधाकर गुरव, संदीप माळी, संदीप काळे, सुषमा बाजारे, अमोल सपकाळ, अमृता स्वामी, दिपाली वेल्हाळ, अनिता जाधव, जयश्री कुलकर्णी यांचे विशेष सहकार्य लाभले. स्पर्धा संपन्न होताना आरोग्य सेेवेसाठी संस्थेच्या पुणेच्या फिजिओथेरपी व नर्सिग कॉलेजच्या वैद्यकीय अधिकार्‍यांचे सहकार्य लाभले. संध्या शिंदे, सविता भोसले, राधिका चित्राव यांनी स्पर्धेचे उत्कृष्ट संयोजन केले. बक्षिस वितरण सोहळयास हे.गो.देशपांडे, स्नेहल कुलकर्णी, आभा तेलंग यांचेसह विविध शाळंाचे मान्यवर पदाधिकारी क्रिडा अधिकारी, प्रशिक्षक व संघ व्यवस्थापक, शिक्षक, शिक्षिका उपस्थित होत्या.