माण-खटाव तालुक्यात दुष्काळ जाहिर करून पॅकेज देण्याची मागणी

म्हसवड  (विजय भागवत):  यंदाच्या वर्षी पावसाने सर्वत्र थैमान घातले असून सर्व ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले असून सातारा जिल्ह्यात माण-खटावचा अपवाद वगळता इतर तालुक्यात अतिपावसामुळे शेतीचे मोठं नुकसान झाले असून  जिल्ह्यातून ओला दुष्काळ जाहिर कराण्यात येऊन शेतकर्‍याच्या नुकसान भरपाई मिळावी या मागणीसाठी एक शिष्टमंडळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांना भेटण्यासाठी जाणार आहे.तर याच्या उलट कायम दुष्काळी माण तालुक्याची परिस्थिती असून एकमेव असलेली माणगंगानदी कोरडी ठणठणाट पडलीआहे.मोठं असलेले आंधळी धरणातही पाण्याचा ठणठणीत आहे.तर बाकी तलावातून उरमोडीच्या पाण्याचा कृत्रिम पाणीसाठा असून तो ही थोड्या दिवसातच संपुष्टात येणार आहे.ओढे- नाले, बोअर, बंधारे, विहिरी कोरड्या पडल्या आहेत.खरीप हंगाम वाया जाण्याच्या मार्गावर आहे पाण्याचा पाण्याचा व जनावरांच्या चार्‍याचा व पाण्याचा प्रश्न बिकट होतं चाललाय पिण्याच्या पाण्यासाठी तहानलेली गावे टॅकरची मागणी करत आहेत.गौरी-गणपतीच्या काळात पाऊस पडला नाही तर माणवासियांना स्थलांतर करण्याची वेळ येण्याची भिती व्यक्त केली जात आहे अशी भयानक अवस्थेत माणचा बळीराजा असताना सातारा जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहिर केला तर माणच्या शेतकर्‍याच्या अन्याय होणार असून जिल्ह्यात ओला दुष्काळजाहिर केला तर दुष्काळाच्या कचाट्यात सापडलेल्या माण-खटाव या तालुक्यात दुष्काळ जाहिर करून विशेष  पॅकेज द्यावे अन्यथा शेतकर्‍यांवर आत्महत्या करण्याशिवाय पर्याय राहणार नाही अशा संतप्त भावना शेतकर्‍यांकडून व्यक्त केली जात आहे.
राज्याच्या कानाकोपर्‍यात पावसाने या वर्षी थैमान मांडले असताना सातारा जिल्ह्यातील कायम निसर्गाची अवकृपा असलेल्या माण तालुक्यात पावसाने दडी मारली असून ऐन पावसाळ्यात सहा टँकरव्दारे  आठ गावांसह बेचाळीस वाड्या-वस्त्यांना  टँकरच्या बारा  खेपाद्वारे पाणी पुरविण्यात येत असून ऐकमेव असलेली माणगंगानदी कोरडी ठणठणीत पडली आहे माणची जनता ऐन पावसाळ्यात टॅकरच्या पाण्यावर तहान भागवत आहे.अनेक गावातून टॅकरची मागणी वाढू लागली आहे.पानवन गावातील महिला वर्गासह अबालवृध्द पिण्याच्या पाण्यासाठी मैल मैल वनवन भटकत आहे.शिवाय या वर्षी बळीराजावर पिकं माना खाली टाकू लागल्यामुळे खरिप हंगाम वाया जाणार असल्याची भिती व्यक्त केली जात असून  बळीराजा दुबार पेरणीच्या भितीने हवालदिल  झाला आहे.येत्या काही दिवसात पावसाने हजेरी लावली नाही.तर माण तालुक्याची दुष्काळाच्या दिशेने वाटचाल सुरू आहे.
ऐन पावसाळ्यात पिण्याच्यापाण्याची टंचाई सुरु  आहे. टँकर भरण्यासाठी  पाच विहीरीअधिग्रहण केल्या आहेत. सध्या पुकळेवाडी,विरळी,पांगरी,पिंगळी खुर्द,उकिर्डे, मोगराळे,तोंडले,जाधववाडी या पाच गावांसह बेचाळीस वाड्या-वस्त्यांना टँकर सुरु आहेत. वडगाव, पिंपरी,टाकेवाडी,कोळेवाडी, महिमानगड,वळई, भाटकी, चिलारवाडी, भालवडी, बिदाल आणि बोडके गावाचे टँकर मागणीचे प्रस्ताव माण तहसील कार्यालयाकडे पाठवले आहेत तर पानवन गावाचा माण पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागाकडे प्रस्ताव आला आहे.
माण तालुका हा कायम दुष्काळी तालुका केवळ पावसाच्या अवकृपेने ओळखला जातो.राज्यात धो धो पडत असलेल्या पावसाने माण तालुक्यात मात्र दडी मारली आहे.सन 2013मध्ये माणवासिय जनतेने  दुष्काळाशी मोठा संघर्ष केला आहे.जनावरांच्या चारा छावण्यावरच गावेच्या गावे वसली होती.त्या दुष्काळी आठवणी ताज्या असताना या वर्षी ही माण तालूक्याची दुष्काळाच्या दिशेनं वाटचाल सुरू झाल्याची चाहूल लागली आहे.जनता पिण्याच्या पाण्यासाठी रात्र दिवस वनवन भटकू लागली आहे.आठ गावे टॅकरच्या पाण्यावर तहान भागवत आहे.
तालुक्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे.पावसाने दडी मारल्याने बाजरी मका ही पिकं माना टाकू लागली आहेत.तर कांदा भुईमुंग ऊस डाळिब द्राक्ष या पिकांच्या पाण्याचा विचार न केलेलाच बरा  माणगंगानदी कोरडी पडली असून उरमोडीच्या पाण्याने नदीचीच तहान भागली नाही.मग माणसांची तहान भागणार कशी? कुकुडवाड गटातील विरळी व पुकळेवाडी या दोन गावांना टॅकरने पाणीपुरवठा सुरू आहे. वळई, आगासवाडी, चिलारवाडी, शेनवडी, काळचौडी या गावांमध्ये पाण्याची समस्या निर्माण झाली आहे.गोंदवले गटातील पिंपरी या गावाला टॅकरने पाणी पुरवठा सुरू आहे. पानवण या गावात टॅकरची मागणी असूनही अद्याप पर्यंत टॅकर दिला गेला नाही.या गावासाठीसुमारे एक कोटी रूपये खर्च करून सात वर्षापुर्वी भारतनिर्माण पेयजल योजनेतून ढाकणी तलावातून पिण्याच्या पाण्याच्या योजनेचे काम सुरू करण्यात आले होते.ढिकणी ते पानवण सुमारे सहा किमीची पाईपलाईनचे कामही झाले आहे.परंतू अद्याप पर्यंत सदर योजना का पुर्ण झाली नाही? या योजनेपुर्वीची मिनीवॉटर सप्लाय योजना बंद अवस्थेत आहे.दोन योजना असून बंद असल्याने असून अडचण नसून खोळंबा अशी अवस्था पानवणकराची झाली असून हमारे चारहजार लोकसंख्या असलेल्या या गावातील माता भगिणीनीना दोन दोन किमी वनवन भटकंती करावी लागत आहे.मुरूमशेडा व खिंडवाडी या वस्त्याकडील विहिरीकडे धाव घ्यावी लागत आहे.विहिरीही कोरड्यापडू लागल्या आहेत.विहिरीतून पाणी काढणे महिलांना अवघड होत आहे.जिव धोक्यात घालून महिला पाण्यासाठी दाहीदिशा भटकत आहेत.तरीही या गावाला टॅकर सुरू का होत नाही.असा सवाल ग्रामस्थ विचारत आहेत.तर धामणी गावाची अवस्थाही बिकट होत चालली आहे.
मार्डी गावावर पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे अनेक भागात पंधरा दिवस पाण्याची वाट पहावी लागत आहे. पाण्यासाठी दाही दिशा भटकंती करण्याची वेळ आली आहे.  गटातील संभूखेड गावातील शेतकर्‍यावर दुबार पेरणीचे संकट ओढेवले असून मका, कांदा, भुईमूग,  बाजरी पिकं माना टाकू लागली आहेत.खरीप हगाम वाया जाण्याची भिती व्यक्त होत आहे.हवालदारवाडी इंजबाव भालवडी कारखेल धुळदेव ही गावेही दुष्काळाच्या छायेत आली आहेत. मुळात सदन भाग कशाला म्हणायचे हेच माहित नसलेले व कायम दुष्काळात जगणारे पर्यती हे गाव कमी आणेवारीत असते.येथील लोकांचा ऐकमेव व्यवसाय म्हणजे कारखान्यावर ऊसतोड मजूर म्हणून काम करून दुष्काळावर मात करणे स्थलांतराचे गाव म्हणजे पर्यंती ही ओळख या गावाची बनली असून यावर्षीही दुष्काळाची परिस्थिती जैसे थे आहे.  बिदाल गटातील बिजवडी तोंडले या गावातून टॅकरची मागणी होत आहे.जाधववाडी मोगराळे या गावात टॅकर सूरू आहे.पाचवड हस्तनपूर दानवलेवाडी या गावानाही दुष्काळाच्या झळा बसू लागल्या आहेत.तर महिमानगड गटात पिंगळी येथे टॅकर सुरू असून महिमानगड उक्रिडे पांढरवाडी स्वरूपखानवाडी आदि गावातील शेतकरीवर्ग हवालदिल झाला आहे.तालुक्यातील मलवडी गटात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडल्याने शेतकरी वर्गात समाधान दिसत आहे.पिण्याच्या पाण्याची समस्या सद्या भेडसावत नसली तरी भविष्यात पाऊस पडला नाही तर परिस्थिती  चिंताजनक होणार हे निश्चित आहे.
माण तालुक्यात 106 गावे महसुली गावे आहेत.ऐन पावसाळ्यात सगळीकडे धो धो पाऊस पडत असताना आठ गावे व बेचाळीस वाड्यावस्त्या सहा टॅकरने पाणी पुरवठा करण्यात येत असून अनेक गावातून टॅकरचे प्रस्ताव येऊ लागले आहेत.अजून काही दिवस पाऊस पडला नाही.तर माण तालुक्याची वाटचाल दुष्काळाच्या दिशेनं सुरू होणार हे निश्चित आहे.ही परिस्थिती असताना तालुक्याच्या तहसिलदार सुरेखा माने यांची उपजिल्हाधिकारी म्हणून बढती होऊन दोन महिण्यांनी माणच्या तहसिलदारपदी केली बाई माने यांची वर्णी लागली आहे. तालुक्याच्या  उदभवलेल्या दुष्काळावर मात करण्यासाठी त्यांना परिश्रमपूर्वक लक्ष द्यावे लागणार आहे.ऑगष्ट महिना सुरू झाला तरी पावसाने दडी मारली आहे.यामुळे शेतकरी वर्ग चिंताग्रस्त झाला आहे.
कायम दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या माण तालुक्यातील जनता सदन भागातील शेतकर्‍याच्या तुलनेत खुपच मागास राहिल आहे.या तालुक्यातील शेतकर्‍याना इतरांच्या तुलनेत मुख्य प्रवाहात आणायचे असेल तर शासनाने विशेष पॅकेज देण्याची गरज आहे.परंतु सातारा जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहिर करण्यात यावा यासाठी आ.शिवेंद्रसिंहराजे भोसले लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांना भेटण्यासाठी जाणार असून ओला दुष्काळ जाहिर करण्यासाठी आग्रही भूमिका घेणार आहेत.जिल्ह्यातील शेतकरी अति  पावसाने अडचणीत आला आहे तर माण तालुक्यातील शेतकरी आभाळाकडे डोळे लावून चातक पक्षाला प्रमाणे पावसाची प्रतिक्षा करत आहे.एकीकडे ओला दुष्काळ पडला आहे तर माण मध्ये कोरड्या दुष्काळाने माणवासिय जनता हवालदिल झाली आहे.
शासनाने सातारा जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहिर केला तर  माण तालुका दुष्काळी जाहिर करून शेतकर्‍यांवर दिलासा द्यावा अन्यथा माणच्या शेतकर्‍याच्या स्थलांतर करण्याशिवाय पर्याय उरणार नाही.