19 नोव्हेंबर 2017 रोजी म्हसवड शहरात मद्य विक्री बंद

सातारा, दि. 18 : मुंबई मद्य निषेध कायदा 1949 मधील कलम 142 (1) मधील तरतुदीनुसार जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी सिद्धनाथ यात्रेच्या मुख्य दिवशी म्हणजे 19 नोव्हेंबर 2017 रोजी म्हसवड शहरातील सर्व देशी दारु किरकोळ विक्री, बिअर विक्री, विदेशी मद्य विक्री, परवाना कक्ष बिअरबार व ताडी दुकाने या अनुज्ञप्तीची जागा व विक्री पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश जारी केले आहेत. या आदेशाचे उल्लंघन केल्यास त्यांच्या विरुद्ध मुंबई मद्य निषेध कायदा 1949 व त्या अंतर्गत नियमान्वये कडक कारवाई केली जाईल, असाही इशारा आदेशात देण्यात आला आहे.