भुजबळांना ईडीचा दे धक्का..

मुंबई: गेले अनेक महिने तुरुंगात असणाऱ्या छगन भुजबळांवर आता नवीन संकट ओढवलं आहे. ईडीनं छगन भुजबळांच्या 22 मालमत्ता जप्त केल्याची माहिती नुकतीच समोर आली आहे. नाशिक आणि मुंबईमध्ये मोक्याच्या ठिकाणी असणाऱ्या भुजबळ्यांच्या संपत्ती ईडीनं जप्त केल्याचे समजते. त्यामध्ये दादरमधील साईकुंड इमारत आणि नाशिकमधल्या भुजबळ वायनरीच्या संपत्तीचा समावेश आहे. काही दिवसांत भुजबळ कुटुंबियांचं नाशिक आणि मुंबईतल्या राहत्या घरावरही कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती, भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांनी दिली आहे.