एक भारत श्रेष्ठ भारत स्पर्धामध्ये सातारचे खेळाडू

साताराः 28 मे ते 3 जुन 2019 पर्यत बेलगाम येथे एक भारत श्रेष्ठ भारत या ब्रीदवाक्या वर सलग 96 तास स्केटिंग करत 200 मी. रिंकच्या 10135 फेर्‍या पुर्ण देशभरातील 308 स्केटर्स नी विश्वविक्रम मध्ये नावाची नोंद केली. यामध्ये सातारा जिल्हयाच्या चॅम्पियन्स स्केटिंग क्लबच्या 9 खेळाडुंनी क्रीडा प्रशिक्षक विनोद कदम सरांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या सहभाग दर्शवला..सानवी पंडीत,ईश्वरी राजेभोसले,वेदांती शिंदे, आर्यन जगदाळे, यशराज घाडगे, अध्ययन बेसके, ओम जाधव, सुमित अंब,े ऐश्वर्या कारंडे हिने क्लबची सिनीअर खेळाडू म्हणुन गृपचे प्रतिनिधीत्व केले.