मतदानासाठी ते आले जर्मनीवरून…..  

   

सातारा :- मतदान हा लोकशाहीतील सर्वात मोठा utchav  आहे. यामध्ये समाजातील सर्व घटक मनापासून सहभागी होत असतात. त्यातही निवडणूक चुरशीची असली की प्रत्येक मताला किंमत असते. कराड उत्तर विधानसभा मतदार संघात ही चुरशीची तिरंगी लढत होत आहे. या ठिकाणी विद्यमान आ. बाळासाहेब पाटील यांच्या विरोधात शिवसेनेचे धैर्यशील कदम व अपक्ष मनोजदादा घोरपडे यांनी मोठे आव्हान निर्माण केले आहे. या निवडणुकी त पुसेसावळी भागांतील प्रत्येक मतदाराला मोठे महत्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे एकएका मताला महत्त्व प्राप्त झाले. पार्टी साठी चांगले योगदान असावे म्हणून जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा भाग्यश्री भाग्यवंत यांनी आपल्या मुलास जर्मनीतून बोलावून घेतले.त्यांचे सुपूत्र जयंतराज भाग्यवंत हे बर्लिन शहरातील आय. व्ही. एन. ओक या कंपनीत बिझिनेस अनीलिस्ट या पदावर कार्यरत आहेत. ते खास मतदानासाठी आले आहेत. त्यांच्यासह पुण्याहून आलेल्या त्यांच्या भगिनी डॉ. तृप्ती,आई सौ. भाग्यवंत मॅडम व वडील हणमंतराव भाग्यवंत या चौघानी एकत्र मतदान केले