सातारा जिल्ह्यात शांततेत मतदान ; मतदानाची सरासरी संध्याकाळपर्यंत 64.47 टक्के, सातारा लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठी सरासरी 65% मतदान ; अंतीम टक्केवारी अद्यायावत करण्याचे काम सुरु

सातारा दि. 21 (जि.मा.का.) : सातारा जिल्ह्यातील आठ विधानसभा निवडणूक मतदार संघात निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडली. 45- सातारा लोकसभा पोटनिवडणुकीसाठी 65.10 टक्के तर आठ विधानसभा मतदार संघासाठी 64.47 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून ही माहिती रात्री 8.15 वाजेपर्यंतची असून अजून 1918 केंद्रांची माहिती अद्ययावत करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरु राहणार आहे, ही आकडेवारी अंतिम नसून अंदाजे आहे.
वाई-64.69 टक्के, कोरेगाव-67.59 टक्के, कराड (उत्तर) -67.79 टक्के, कराड (दक्षिण)-68.77 टक्के, पाटण-63.91 टक्के, सातारा-58.84 टक्के, फलटण – 64.13 टक्के, माण-61.35 टक्के