मतमोजणीदिवशी जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधीत राहण्यासाठी कलम ३६ लागू

सातारा, दि.22 (जिमाका) : सातारा जिल्हयातील ४५- सातारा लोकसभा पोटनिवडणूक व ८ विधानसभा निवडणुक मतदार संघासाठी २४ ऑक्टोबर रोजी सकाळी ७ ते सायं.6 वाजेपर्यंत मतमोजणी प्रक्रीया पार पडणार आहे. या निवडणूक प्रक्रीया कालावधी दरम्यान आयोजित केले जाणारे विविध कार्यक्रम, मिरवणूका या संबंधाने वाहनांच्या वाहतुकीचे नियमन करणे, तसेच मिरवणूकीच्या मार्गासंबंधाने व मिरवणूकीतील लोकांचे वर्तन कसे असावे आणि ध्वनी प्रदुषणाचे अनुषंगाने मा. सर्वोच्च न्यायालयाने घालुन दिलेल्या निर्बंधाचे पालन व्हावे, लाऊउस्पिकरचा योग्य वापर व्हावा या करीता महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३६ नुसारचे अधिकारानुसार सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी लोकसभा पोट निवडणूक व विधानसभा निवडणुक २०१९ ची प्रक्रीया, कायदा व सुव्यवस्था बंदोबस्त कामी नेमलेल्या सर्व उप विभागीय पोलीस अधिकारी, सर्व पोलीस निरीक्षक, सर्व पोलीस उपनिरीक्षक यांचेसह बंदोबस्तावरील अन्य सर्व पोलीस अधिकारी यांना 24 ऑक्टोबर रोजी सातारा जिल्हयातील जनतेचे स्वास्थ्य, सुरक्षा आणि कायदा व सुव्यवस्था अबाधीत रहावी म्हणुन वाहनांच्या नियमना संदर्भात, मिरवणुकीच्या मार्गासंबधाने मिरवणुकीतील व्यक्ती अथवा व्यक्तींच्या समुहाचे वर्तन कसे असावे, ध्वनी प्रदुषणाचे अनुषंगाने मा. सर्वोच्च न्यायालयाने घालुन दिलेल्या निबंधाचे यथोचित पालन व्हावे या दृष्टीने आवश्यक असणारे सर्व निर्देश देणेचे अधिकार प्रदान केले आहेत, असे पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते यांनी एका पत्रकान्वये कळविले आहेत.