मेढा (प्रतिनिधी) – एक सप्टेंबर 2014 पासून केंद्र सरकारच्या बदलामुळे पेन्शनरांना सन्मान जनक पेन्शन मिळवण्याचा हक्क नष्ट केल्याने ईपीएस पेन्शनधरकांचे वतीने सरकारला जागे करण्यासाठी
थाळी वाजवा आंदोलन करण्यात येणार आहे.
या आंदोलनाचे आयोजन रविवार दिनांक 23 एप्रिल 2023 रोजी सकाळी अकरा वाजता राजवाडा येथे करण्यात आल्याची माहिती प्रमोद परमणे यांनी दिली.
केंद्र सरकारने लागू केलेल्या 609 या बदलामुळे चांगले पेन्शन मिळवण्याचा हक्क सरकारने नष्ट केल्यामुळे सरकारने पेन्शनरांना नऊ हजार रुपये पेन्शन द्यावी, महागाई भत्ता चालू करावा, सप्टेंबर 2014 नंतर लागू केलेली प्रोराटा पद्धत रद्द करावी ,पेन्शनदारांना निवृत्तीच्या तारखेपासून फरक द्यावा पेन्शन योजनेचे झालेले नुकसान भरून द्यावे, पेन्शनदारांचे पैसे शेअर बाजार मध्ये गुंतवणे बंद करा , पेन्शनरांना प्रवासात सवलत मिळावी, मोफत वैद्यकीय सेवा मिळावी या विविध मागणी करीता हे रिकामी थाळी वाजवा आंदोलन करण्यात येणार आहे .
बँक एम्प्लॉईन युनियनचे अतुल दिघे, गोपाळ पाटील, अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन करण्यात येणार आहे.केंद्र सरकारने चुकीच्या पद्धतीने पेन्शन धारकांच्या बाबतीत अवलंबले असणाऱ्या या धोरणास विरोध असल्याने सातारा जिल्ह्यातील जास्तीत जास्त ईपीएस पेन्शनरांनी आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे
पेन्शनरांची अवहेलना होऊ नये त्यांना सन्मान जनक पेन्शन मिळावी याकरिता हे आंदोलन करण्यात येणार असून अल्प प्रमाणात मिळणारी पेन्शन हे घरखर्च सुद्धा भागवू शकत नाही.या आंदोलनाच्या माध्यमातून सर्व पेन्शनरांना न्याय देण्याचा आमचा प्रयत्न असून पेन्शन वाढ होत नाही तोपर्यंत आम्ही सर्वजण एकत्र येऊन हा लढा देत राहणार आहे.
श्री प्रमोद परमणे