पश्चिम महाराष्ट्रात भूकंपाचा सौम्य धक्का

सातारा :  आज शुक्रवार दि. १० रोजी पहाटे ५.२० मिनिटांनी भूकंपाच्या सौम्य धक्क्याने पश्चिम महाराष्ट्र हादरला. या भूकंपाचा केंद्रबिंदू कोयनेपासून २१.६ किलोमीटर अंतरावरील वारणा खोऱ्यात असल्याची  माहिती मिळाली  आहे. पश्चिम महाराष्ट्रासह  कोकणातील रत्नागिरी, चिपळूण या भागातही भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. ३.५ रिश्टर स्केलची क्षमता असलेल्या या भूकंपाने कोणत्याही प्रकारची जिवीत किंवा वित्त हानी झालेली नाही.