शेंद्रे गटातील प्रत्येक गावाचा चौफेर विकास करणारः आ. शिवेंद्रसिंहराजे ; मापरवाडी येथे पुर्ण झालेल्या कामांचे लोकार्पण

साताराः पुर्वी केवळ अन्न, वस्त्र आणि निवारा या मुलभूत गरजा असयच्या. आज या तीन्ही गरजांबरोबरच मानवाला दर्जेदार रस्ते, वीज, मुबलक पाणी अशा बाबींचीही नितांत गरज आहे. सातारा जावली मतदारसंघात प्रत्येग गाव, वाडी, वस्तीवर रस्ते पोहचले आहेत. प्रत्येक गावात अंगणवाडी, शाळा, सभागृह, सुसज्ज पाणीपुरवठा योजना, पथदिवे अशी आवश्यक ती सर्व विकासकामे केली आहेत. याचपध्दतीने आगामी काळात शेंद्रे गटातील प्रत्येक गावाचा चौफेर विकास करणार आहे, अशी ग्वाही आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली.
मापरवाडी ता. सातारा येथे स्व. श्री. छ. अभयसिंहराजे भोसले सभागृह, कै. स्वा. सै. आण्णा धोंडिबा चव्हाण स्मरणार्थ बांधलेली स्वागत कमान आणि नूतन अंगणवाडी इमारतीच्या उदघाटनप्रसंगी आ. शिवेंद्रसिंहराजे बोलत होते. यावेळी पंचायत समितीचे सभापती मिलिंद कदम, जितेंद्र सावंत, अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सर्जेराव सावंत, बाजार समितीचे सभापती अ‍ॅड. विक्रम पवार, संचालक दत्तात्रय शिंदे, खरेदी विक्री संघाचे संचालक सुरेंद्र देशपांडे, संचालक सुशांत माने, पंचायत समितीचे माजी उपसभापती अरविंद चव्हाण, माजी सदस्या सौ. सुदर्शना चव्हाण, अनंता वाघमारे, नामदेव सावंत, अरुण कापसे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना आ. शिवेंद्रसिंहराजे म्हणाले की, शेंद्रे गटातील प्रत्येक गावात रस्ता, पोहचला आहे. खड्डेविरहीत रस्ते होण्यासाठीही सातत्याने पाठपुरावा करुन रस्ते दुरुस्ती केली जात आहे. बोगदा ते शेंद्रे या रस्त्यासाठी 95 लाख तर, सोनगाव ते शिवाजीनगर या रस्त्यासाठी निधी मंजूर केला असुन या प्रमुख रस्त्यांची कामे लवकरच मार्गी लागणार आहेत. आवश्यक त्या ठिकाणी पाणी साठवण बंधारे बांधून शेंद्रे गटातील सिंचनाचा प्रश्‍न सोडवण्यात आला आहे. प्रत्येक गावात ग्रामस्थांच्या मागणीनुसार विकासकामे मार्गी लावली जात असून आगामी काळात शेंद्रे गटातील प्रत्येक गावाचा चौफेर विकास पहायला मिळेल.
अरविंद चव्हाण यांनी प्रास्ताविक केले. नवनाथ चव्हाण यांनी आभार मानले. कार्यक्रमास मापरवाडीचे माजी सरपंच अनिल चव्हाण, विद्यमान सरपंच सुजाता चव्हाण, उपसरपंच शुभांगी चव्हाण, सदस्य विजय चव्हाण, दिपाली बाबर, वामन चव्हाण यांच्यासह मापरवाडी, आसनगाव, कुमठे, शेरेवाडी, कुसवडे पठार यासह शेंद्रे गटातील विविध मान्यवर आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.