शासनाने जबरदस्तीने महामार्गाचे काम सुरू केल्यास 27 डिसेंबरला रास्ता रोको 

म्हसवड : मासाळवाडी परिसरातील शेतकरी मागील 4 वर्षे पाऊस न पडल्याने पिळवटून गेला असताना शासन या दुष्काळी भागातील शेतकर्‍याच्या शेतातून रस्ता काढून त्यांना त्या बदल्यात कोणताही मोबदला न देता त्यांच्या संसारावरून नांगर फिरवण्याचे पाप करत आहे. जर शासन जबरदस्तीने दमदाटी व प्रशासकीय ताकत वापरून जमिनीचे अधिग्ररहण न करता काम सुरू करण्याचा प्रयत्न केला तर 27 डिसेबर रोजी आंदोलन तीव्र करून म्हसवड येथे रास्ता रोको करून तलाटी कार्यालयावर सर्व शेतकरी आत्ममदहन करतील अशा इशारा शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने देण्यात आला.
म्हसवड-टेंभूर्णी महामार्ग क्रमांक 548 या राष्ट्रीय महामार्गाचे रस्त्याचे काम म्हसवड हद्दीतून सुरू करण्यात आले आहे. सदर रस्त्याचे कोणतेही भुसंपादन करण्यात आले नाही. मासाळवाडी परिसरातील शेतकर्‍यांच्या मालकीच्या जमिनीतून रस्त्याचे काम प्रशासकीय विभागाकडे करूनही कसलीही दखल न घेता उलट उदरनिर्वाचे साधन नष्ट करून शेतकर्‍यांच्या संसारावर नागर चालवून देशोधडीला लावण्याचा प्रयत्न सुरू केले आहेत. याच्या निषेधार्थ आज शेतकर्‍यांच्या या मोर्चात सर्व पक्षीय नेतेमंडळी सहभागी झाली होती.
या मोर्चामध्ये नगराध्यक्ष तुषार विरकर, माजी नगराध्यक्ष डॉ.वसंत मासाळ, नितिन दोशी, भाजपचे तालुका अध्यक्ष बाळासाहेब मासाळ, डॉ.प्रमोद गावडे, बबनदादा विरकर, आप्पा पुकळे, नगरसेवक अकिल काझी, संजय सोनवणे,  पै.बाळासाहेब काळे,  बाळाप्रसाद किसवे, अ‍ॅड. शिवाजी तरटे, दादासाहेब दोरगे, अजित केवटे अंगुली बनसोडे, लुनेश विरकर, बी.एम.अबदागिरे व शेतकरी व महिला मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
यावेळी मोर्चा तलाटी कार्यालयाजवळ आल्यानंतर मोचार्र्चे रूपांतर सभेत झाले. या वेळी सर्ववच राजकीय नेते मंडळीनी शासनाच्या या जुलमी कारभारावर कडाडून हल्ला चढवत शेतकर्‍यांच्यावर होत असलेल्या या अन्यायाच्या विरोधात शासनाने हे पाप करू नये. इथला शेतकरी अगोदरच दुष्काळी परिस्थितीने पिचला आहे. त्यांना न्याय मिळेपर्यंत आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार असल्याची भुमिका सर्व पक्षीय नेत्यानी या वेळी घेतली.
या वेळी शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने निवेदन देण्यात आले. निवेदनात पुढे म्हटले आहे की, म्हसवड-टेभुर्णी हा रस्ता जुन्या नकाशाप्रमाणे करावा, रस्त्यालगतच्या सर्व सर्वे नंबरची मोजणी करूनच लागणारे क्षेत्र शेतकर्‍यांसमक्ष अधिग्ररहण करावे, जे क्षेत्र अधिग्ररहण केले जाणार आहे त्याचा आर्थिक मोबदला काम सुरू होण्यापुर्वी मिळावा, यासह जे निर्णय घेण्यात येणार आहेत. ते शेतकर्‍याच्या शेतात येऊन घ्यावेत आदि मागण्या करण्यात आल्या आहेत.
जर शासनाने जबरदस्तीने दमदाटी करून प्रशासकीय ताकत वापरून शेतकरी विरोधी भुमिका घेऊन महामार्गाचे काम सुरू करण्याचा प्रयत्न केला तर 27 डिसेंबर रोजी म्हहसवड येथे रास्ता रोको करून तलाटी कार्यालयासमोर सर्व शेतकरी कुटुबासह आत्ममदहन करतील अशा इशारा शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने देण्यात आला आहे.
आंदोलनकर्त्यांनी माण-खटावचे उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांचेशी भ्रमणध्वनीव्दारे संपर्क साधला असता त्यांनी दि. 7 डिसेबर रोजी सायं.4 वा. जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांची शेतकर्‍यांबरोबर बैठक आयोजित करण्यात आली असल्याचे सांगितले.