दुध दर वाढीसाठी शेतकर्‍यांचा तहसील कार्यालयावरती मोर्चा 

कराड: म्हशीच्या दुधाला प्रतिलिटर 30 रूपये भाव देण्यात यावा या मागणीसाठी बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीने आज येथील तहसील कार्यालयावर शेतकर्‍यांचा मोर्चा निघाला होता.
या मोर्चाचे नेतृत्व बळीराजा शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष पंजाबराव पाटील यांनी केले. महागाई मोठया प्रमाणात वाढली आहे.
जनावरांच्या खाद्याचे दर आवाक्याबाहेर गेले आहेत. असे असताना दुध खरेदीदार दुधाचा पाडुन दर देत आहेत त्यामुळे खर्च वजा जाता  शेतकर्‍यांच्या हातावर पैसा शिल्लक राहत नाहीत दुधाचा दर शासनाने ठरवुन द्यावा अशी शेतकर्‍यांची मागणी आहे.
परंतु शासनानेही या मागणीकडे आजपर्यंत डोळेझाक केली आहे. शासनाने दुध दर वाढ केली नाही तर या प्रश्‍नी  शेतकर्‍यांना तीव्र आंदोलन छेडावे लागेल. असा इशारा तहसीलदारांना निवेदनात देण्यात आलं आहे. मोर्चात कराड व पाटण तालुक्यातील शेतकर्‍यांचा सहभाग होता. मोर्चा कोल्हापुर नाक्यावरून दत्त चौक मार्गे तहसीलदार कार्यालयावर नेण्यात आला.
फफफफफफफफफ
वाग्देव महाराज पुण्यतिथी व रथयात्रेनिमीत्त वाठार स्टेशन येथे भव्य वार्षिक जनावरांचा बाजार
वाठार स्टेशन : श्री समर्थ भगवान वाग्देव महाराज यांच्या 82 व्या पुण्यतिथी निमित्त सालाबादप्रमाणे दि.26 डिसेंबर ते 2 जानेवारी पर्यंत वार्षिक जनावरांचा बाजार घेण्यात आला आहे संपुर्ण महाराष्ट्रातून जातीवंत खिल्लार जनावरांची आवक झाली असून जनावरांच्या बाजारात खरेदी-विक्री व्यवहार तेजीत सुरू आहेत
वाठार स्टेशन येथील श्री समर्थ भगवान वाग्देव महाराजांच्या पुण्यतिथी व रथ सोहळ्यानिमित्त आयोजित केलेला वार्षिक जनावरांचा बाजार महाराष्ट्रासह इतरही राज्यात चांगलाच प्रसिद्ध झालेला आहे.
येथे मोठया संख्येने जनावरे सहभागी झाली आहेत यामध्ये सातारा,सोलापूर, बारामती, सांगली, येथील व्यापार्‍यानी या बाजारात खिल्लार बैल,खोंड, तसेच गाई विक्रीसाठी आणले आहेत .
 या बाजाराचे उदघाटन कोरेगाव पंचायत समितीचे उपसभापती संजय साळुंखे,देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष निवृत्ती भाऊ करे, मा.प.स.सदस्य अंकुशकाका जाधव,ज्ञानेश्वर माऊली कदम,रामचंद्र करे,मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती मा.चेअरमन बाळासाहेब सोळस्कर,राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते अजितदादा भोईटे, कोरेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन प्रतापराव कुमुकले, मा.चेअरमन अजय कदम,जि. प.सदस्य मंगेश धुमाळ,वाठार स्टेशनचे सरपंच बाळासाहेब जाधव,मा.सरपंच महेश लोंढे,बळीराम काळोखे,नामदेव जाधव,पिंपोडे बु।्।चे सरपंच नैणेश कांबळे,वाठार स्टेशन ग्रामस्थ व पंचक्रोशीतील नागरिक उपस्थित होते