आजपासून नव्या चार चाकी वाहनांना ‘फास्ट टॅग’ बंधनकारक 

दिल्ली :  नव्या चार चाकी वाहनांना आज शुक्रवार दि. १ डिसेंबरपासून ‘फास्ट टॅग’ बंधनकारक झाला आहे. या बाबतचा निर्णय केंद्र शासनाने मागील नोव्हेंबर महिन्यात घेतला होता .
‘फास्टटॅग’ विक्रेत्या एजन्सीज्, बँका किंवा टोल प्लाझांमध्येही हा टॅग मिळू शकतो. टोल नाक्यांवर वाहन चालकांना टोल भरण्यासाठी रोख रक्कम अदा करावी लागत होती. त्यामुळे चालकांचा वेळ वाया जात होता. वाहन चालकांच्या वेळेची बचत व्हावी, यासाठी थेट वाहन चालकांच्या बॅंकेतील खात्यातून टोलची रक्कम अदा करण्यासाठी ‘फास्ट टॅग’ यंत्रणेची अंमलबजावणी काही महिन्यांपूर्वीच सुरु झाली. वाहन उत्पादक आणि विक्रेत्यांनी ही सुविधा वाहन चालकांना उपलब्ध करुन द्यावी, असे केंद्रीय नागरी वाहतूक मंत्रालयाने सांगितले आहे.