रामदास जावीर यांना प्रशंसनीय कामगिरी बद्दल पोलीस आयुक्तांनी गौरवले

मायणी :-(सतीश डोंगरे)   मायणी गावचे सुपुत्र,मुंबई येथे पोलीस खात्यात कार्यरत असणारे रामदास जावीर यांनी त्यांच्या कर्तव्यात कोणतीही कसूर न ठेवता उत्कृष्ट कामगिरी बजावल्या बद्दल पोलीस आयुक्त डी डी पडसलणीकर यांच्या हस्ते गौरवण्यात आले.
‎याबाबत अधिक माहिती अशी, मुंबई येथे कार्यरत असणारे रामदास जावीर यांनी अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत कठोर मेहनत घेऊन पोलीस खात्यात नोकरी मिळून आई वडिलांच्या विश्वास सार्थ केला होता. त्यांनी कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या वेळी तात्काळ दखल घेऊन कौशल्यपूर्ण नियोजनबद्ध आखणी करून कर्तव्य बजावित उच्च न्यायालय ,मुंबई परिसरात कोणताही अनुचित प्रकार घडू दिला नाही त्यांच्या या उत्कृष्ट व प्रशंसनीय कामाबद्दल बृहन्मुंबई चे पोलीस आयुक्त डी डी पडसलणीकर यांनी प्रशंसापत्र देऊन जावीर यांना गौरवले .श्री जावीर यांच्या या कामगिरी बदद्दल मायणीकरांनी त्यांचे कौतुक व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.