पत्रकार दिनानिमीत्त सरस्वती वाचनालय व म्हासुर्णे गावच्या वतीने तुषार माने यांचा सत्कार

म्हासुर्णे प्रतिनिधी : मराठी पत्रकार दिनानिमीत्त म्हासुर्णे ता.खटाव येथील सरस्वती वाचनालय व म्हासुर्णे गावच्या वतीने पत्रकार तुषार माने यांचा सत्कार कार्यक्रमाचे अध्यक्ष शिक्षण सल्लागार मंडळाचे चेअरमन महादेव माने, प्रमुख पाहुणे प्राध्यापक ज्ञानेश्वर माने सर यांच्या हस्ते करण्यात आला.कार्यक्रमावेळी वैयक्तिक स्वरुपात प्रा.ज्ञानेश्वर माने,महादेव माने यांनी पत्रकार तुषार माने यांचा सत्कार पत्रकार दिनानिमित्ताने केला. यावेळी बी.एन.इनामदार सर,प्रा.ज्ञानेश्वर माने सर,आर.जी.कुलकर्णी सर,व्हि.एल कुलकर्णी सर,शिक्षण सल्लागार मंडळाचे अध्यक्ष महादेव माने यांची भाषणे झाली.यावेळी जेष्ठ नागरीक संघाचे अध्यक्ष हरिचंद्र माने,शिक्षण सल्लागार मंडळाचे संचालक आर.जी.कुलकर्णी ,व्हि.एल.कुलकर्णी सरस्वती वाचनालयाचे माहिती अधिकारी बी.एन.इनामदार सर,मा,ग्रामपंचायत सदस्य धनाजी माने,एम.पी.माने साहेब,शंकर माने,देवीदास माने,शिवाजी माने,तसेच सरस्वती वाचनालयाचे सर्व वाचक व म्हासुर्णेतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.प्रास्तविक बी.एन.सर यांनी केले तर आभार माने यांनी मानले.