श्रीपाद छिंदम याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा : पाटण येथे शिवप्रेमींची मागणी

पाटण :- महाराष्ट्र राज्याचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बदल अहमदनगर महानगरपालिकेचा उपमहापौर श्रीपाद छिंदम याने अपशब्द वापरून महाराष्ट्रातील तमाम शिवभक्त, शीवप्रेमी यांची मने दु:ख वून देशद्रोही सारखा गुन्हा केला आहे. अशा या देशद्रोही माणसावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून कठोरात कठोर कारवाई करावी अशी मागणी पाटण येथील शिवप्रेमी – शिवभक्तांनी तहसीलदार पाटण यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
यावेळी तहसीलदार रामहरी भोसले यांना निवेदन देताना सत्यजितसिंह पाटणकर, दिपकराव शिंदे, यशवंतराव जगताप, नाना क्षिरसागर, फत्तेसिंह पाटणकर, संजय इंगवले, शंकराव मोहिते, विक्रांत कांबळे, समिर सय्यद, राजू राऊत, अजय कवडे, किरण पवार, सचिन देसाई, गणेश मोरे, चंद्रकांत मोरे, मनिष चौधरी, मुबारक सरकवास, सुरेश संकपाळ, यांच्या सह शिवभक्त-शिवप्रेमी उपस्थित होते. या निवेदनात पुढे म्हणले आहे. संपूर्ण हिंदुस्थानाचे आराध्य दैवत असलेल्या आणि मराठी माणसांची अस्मिता असणार्या छत्रपती शिवाजी महाराज यांचे विषयी अहमदनगर महानगरपालिकेचा उपमहापौर श्रीपाद छिंदम याने असभ्य भाषा वापरून समस्त शिवप्रेमीच्यां भावनांचा अपमान केला. शिवछत्रपतींचा दैदिप्यमान इतिहास माहीत नसणाऱ्या या वेडपट आणि देशद्रोही माणसाचा जाहीर निषेध करून त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून कठोरात कठोर शिक्षा करण्यात यावी. अशी मागणी शिवजयंती उत्सव समिती पाटण व सर्व शिवप्रेमी बांधवांच्या वतीने करण्यात आली आहे.