मंडप गोडाऊनला आग ; मोठे नुकसान 

सातारा : श्रीरंग मंडप डेकोरेटर वर्ये येथील गोडाऊनला भीषण आग लागली.  बुधवारी सायंकाळी 5:30 आग सुमारास लागली. आगीत मंडप डेकोरेशनचे जवळपास लाखो रुपये किंमतीचे साहित्य जळून खाक झाले.
मंडप डेकोरेशनच्या साहित्याला आग लागल्याची माहिती मिळताच त्या ठिकाणी अग्नीशमन दलाला पाचारण करण्यात आले. आग कशामुळे लागली याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.  घटनास्थळी पोलिस दाखल झाले आहेत.