भुषणगड येथे मोफत गॅस वाटप

म्हासुर्णे (प्रतिनिधी तुषार माने ): भुषणगड ता.खटाव येथे दिनांक 14/10/2018 रोजी भुषणगड येथे उज्ज्वला गॅस योजने अंतर्गत मोफत गॅस वाटप मा. जिल्हा परिषद सदस्य पुसेसावळी , कराड उत्तर चे नेते सन्माननीय जितेंद्र(दादा )पवार ग्रामपंचायत सदस्य लाडेगाव सन्माननीय दिलीप यादव, संजय शिंदे यांच्या हस्ते झाले. यावेळी उपस्थित मान्यवरांची भाषणे झाली यावेळी जितेंद्र पवारांनी आपल्या मनोगतामधये जिल्हा परिषद निवडणुकीत गावाने भरभरून मते दिली त्याबद्दल भुषणगड वासियांचे आभार मानले. येथुन पुढच्या काळात कोणत्याही प्रकारची भुषणगड वासियांना मदत लागली तर आपले दरवाजे रात्री च्या बारा वाजता देखील उघडे असतील अशा प्रकारची हमी दिली आणि ग्रामस्थांनी टाळ्यांचया कडकडाटात स्वागत केले. पुढे त्यांनी गावच्या विकासासाठी 100 टक्के कामे देण्याचे आश्वासन दिले. जितेंद्र दादांच्या विचारांची ग्रामपंचायत बिनविरोध दिल्या बद्दल सवॅ भुषणगड वासियांचे आभार मानले. यावेळी दिलीप यादव यांनी आपले मनोगत व्यक्त केले ते म्हणाले भुषणगड हे ऐतिहासिक वारसा लाभलेल गाव आहे त्यामुळे गावच्या विकासासाठी दादांच्या खांद्याला खांदा लावून काम केले जाईल असे आश्वासन दिले.यावेळी कार्यकत्यांना मार्गदर्शन केले ते म्हणाले संघटना बांधणीवर भर दया प्रत्येक सदस्याला प्रत्येकी 25 कार्यकर्ते विधानसभा निवडणुकीपुवीॅ
जोडण्यास सांगितले. हा पॅटर्न येत्या काळात संपूर्ण जिल्हा परिषद गटात राबवला जाईल अशा प्रकारची हमी दिलीप यादव यांनी दिली. यावेळी मोहन मदने यांनी मान्यवरांचे आभार मानले. कार्यक्रमास भुषणगड चे सरपंच मदने, उपसरपंच सरनोबत, सदस्य जाधव , मदने गुरूजी , धोंडीराम जगताप सर्व ग्रामपंचायत सदस्य तसेच ग्रामस्थ मोठय़ा संख्येने उपस्थित होते