सनातन संस्था सातारा च्या वतीने शाहुपुरी येथे मोफत आरोग्य तपासणी

सातारा : सनातन संस्था साताराच्या वतीने समता पार्क, शाहुपुरी येथील आनंद केटरर्स येथे मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. यावेळी डॉ. मंगला वाघ आणि डॉ. संध्या देशपांडे यांनी रक्तदाब तपासणी करण्यात आली.
सध्याच्या धकाधकीच्या जीवनात लहान वयातच रक्तदाबाचे त्रास होत असल्याने आरोग्याविषयी जागरुकता निर्माण करण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. योग्य रक्तदाब ठेवण्यासाठी दिनचर्येत करायचे उपयुक्त बदल या विषयीचे मार्गदर्शन डॉ. वाघ यांनी केले. परिसरातील 50 हून अधिक नागरिकांनी या उपक्रमाचा लाभ घेतला.