तोतया अधिकारी घालतोय पोलिसांना गंडा

सातारा :- गेल्या काही दिवसांपासून सातारा शहर व परिसरात आपण डिप्लोमॅटिक अधिकारी असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार असल्याची बतावणी एक तोतया महिला करताना दिसत आहे तसेच तिचा पती ही तिला या प्रकरणात साथ देत असून तोही उच्चपदस्थ अधिकारी असल्याचे सांगत आहे ते अद्याप पर्यंत कोणत्याच कायद्याच्या कचाट्यात न सापडल्यामुळे पोलिसांनाही त्यांच्यावर कारवाई करणे जड जात आहे मात्र दोन दिवसांपूर्वी गोडोली येथे एक गाडी खांबाला धडकून अपघात झाला या गाडीत दारूच्या बाटल्या मोठ्या प्रमाणावर मिळून असल्याचे समजते व ही गाडी सुद्धा या दांपत्याची असल्याचे समोर येत आहे त्यामुळे आता तरी पोलिसांनी यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी समाजातून होऊ लागली आहे
याबाबत अधिक माहिती अशी की, गेल्या काही दिवसांपासून एक महिला मी डिप्लोमॅटिक अधिकारी असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आहे मला अजित डोवाल वारंवार फोन करून माहिती विचारत असतात तसेच याबाबतची काही कागदपत्रे ही महिला दाखवत असते त्यामध्ये या महिलेला तिचा पती ही साथ देत असतो व तोही दिल्लीमध्ये उच्चपदस्थ अधिकारी असल्याची बतावणी करत असतो तुमची बदली करून देतो टेंडर मिळवून देतो तसेच पोलिसांच्या कचाट्यातून सोडवतो अशी विविध प्रलोभने हे दांपत्य दाखवत असतात त्यामुळे आत्तापर्यंत अनेक जण त्यांच्या जाळ्यात अडकलेले आहेत यामधून त्यांनी आतापर्यंत पाच ते सहा कोटी रूपयांची माया गोळा केली असल्याची चर्चा दबक्या आवाजात साताऱ्यात सुरू आहे परंतु अद्याप पर्यंत पोलिसांकडे एक ही तक्रार दाखल नसल्यामुळे पोलिसांनाही कायद्याने कारवाई करणे जड जात आहे
मध्यंतरी सातारच्या जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांना ही तोतया महिला आपण दिल्लीतील राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार असल्याची बतावणी करत भेटायला गेली होती त्यावेळी आयएएस अधिकारी असणाऱ्या स्वेता सिंगल ज्यांनी त्यांच्या चाणाक्ष नजरेतून या तोतया महिलेला ताबडतोब ओळखले होते परंतु त्या महिलेबद्दल कोणतीच तक्रार नसल्यामुळे त्या वेळी त्यांना कोणतीही कारवाई करता आली नव्हती परंतु आता पोलिसांना कारवाई करण्याची आयती संधी चालून आली आहे दोन दिवसांपूर्वी गोडोली येथील विद्युत खांबाला एक चार चाकी गाडी धडकली ही गाडी या दाम्पत्याच्या असल्याचे समजते परंतु ती गाडी शासना ने आम्हाला वापरण्यासाठी दिली आहे असे धूळफेक हे दांपत्य करताना दिसत आहे या गाडीमध्ये काही दारूच्या बाटल्या पोलिसांना मिळून आले आहेत सध्या सर्वत्र लोक डाऊन असताना या गाडीत दारूच्या बाटल्या आल्या कुठून यानिमित्ताने पोलिसांनी या दांपत्याच्या घराची झाडाझडती घेतली व सर्व तपासणी केली तर अनेक धक्कादायक माहिती पोलिसांच्या हाती लागू शकते सध्या कोरोनामुळे पोलिस व्यस्त आहेत परंतु पोलिसांनी वेळात वेळ काढून हा पकडला तर या दंपत्या कडून फसवणुकीचा होणारा संसर्ग तरी साताऱ्यात थांबेल अशी अपेक्षा सर्वसामान्य सातारकर करताना दिसत आहेत