गाढखोप ग्रामपंचायतीवर शिवसेनेची सत्ता

पाटण  -(प्रतिनिधी) कोयना विभागात सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या गाढखोप ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेनेने एकहाती सत्ता घेऊन सर्वच्या सर्व उमेदवार निवडून आणले. पाच सदस्य जागा असलेल्या या ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंचसह तीन जागा बिनविरोध शिवसेनेच्या निवडून आल्या होत्या. दोन जागासाठी झालेल्या निवडणुकीतील निकालात सौ. हौसाबाई दगडू कदम, आणि भागवत तुकाराम कदम हे उमेदवार निवडून आले.

गाढखोप ता. पाटण ग्रामपंचायतीच्या दोन जागेसाठी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी बुधवारी सकाळी ११ वा. तहसिल कार्यालयात घेण्यात आली. या निवडणुकीत केदारनाथ वार्ड क्र. तीन मधून सौ. हौसाबाई दगडू कदम, भागवत कृष्णाजी जाधव हे उमेदवार निवडून आले. तर सौ. हर्षा विष्णूनाथ कदम, भागवत तुकाराम कदम यांचा पराभव झाला. बिनविरोध निवडून आलेल्या मधे संरपंच- अशोक विष्णू मोहिते, सदस्य- सौ. कविता गणेश मोहिते,सौ. अनुसया भिवाजी यादव, शिवाजी मनोहर कदम, यांची निवड झाली. विजयी उमेदवारांचे आ. शंभुराज देसाई, शिवसेना पाटण तालुका नेते जयंवतराव शेलार, हरिष भोमकर, अशोक पाटील, डि.डि. कदम, सिताराम कदम, बाजीराव कदम, चंद्रकांत मोहिते, शरद कदम, प्रकाश मोहिते, यदूशेट यादव, गणपत मोहिते सुरेश जाधव आदीनी अभिनंदन केले. निवडणुक निकालानंतर कार्यकर्त्यांनी विजयी उमेदवारांची गुलाल उधळून मिरवणूक काढली.

फोटो- विजयी उमेदवारांसोबत जल्लोष करताना कार्यकर्ते.