गणपती स्टॉल धारकाकडून जिल्हा प्रशासनाच्या आदेशाची पायमल्ली

 बांधकाम विभागाचे दुर्लक्ष, शिस्त लावण्याची गरज
सातारा : सातारा-कोरेगाव रोडवरील बाँबेरेस्टॉरंट चौक ते कृष्णानगर या ठिकाणी रस्त्याच्या दुतर्फ बाजुला बाप्पाच्या मुर्तींचे स्टॉल विक्रीसाठी अनाधिकृतपणे परप्रांतीयांनी लावले आहेत. गेल्या दोन वर्षापूर्वीच जिल्हा प्रशासनाने सातारा-पंढरपूर रस्त्याच्या कडेला बप्पाचे स्टॉल लावण्यास सक्तीने निर्बंध घातले आहेत. मात्र, जिल्हा प्रशासनाच्या आदेशाची पायमल्ली करून परप्रांतियांनी गणपती स्टॉल लावले आहेत.
 याबाबत सविस्तर माहिती अशी की, सातारा-पंढरपूर रस्त्याच्या रूंदीकरणाचे काम गेल्या आठ ते दहा वर्षापासून अत्यंत धिम्म्या गतीने काम सुरू आहे. पोवईनाका येथून वनवासवाडी पर्यंत रस्त्याच्या रूंदीकरणाचे काम करताना रस्त्याच्या कडेला फिरता व्यवसाय करणार्‍या परप्रांतियांचे प्लॅस्टीक कागदाचा वापर केलली राहुटी गेल्या दोन वर्षापूर्वी पोलीस बंदोबस्तामध्ये काढण्यात आली आहेत. बारा महिने हे परप्रांतीय लोक छ. शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सह इतर महापुरूषाच्या छोट्या मुर्त्या तसेच वृक्षारोपण करण्यासाठी लागणार्‍या कुंड्या चार चाकी गाड्यावरून सातारा शहरात विक्री करत असतात. मात्र त्या ठिकाणी गणपतीच्या मुर्ती विक्रीचे स्टॉल उभे न करता सातारा-पंढरपूर रोडवर बाँबेरेस्टॉरंट चौक ते कृष्णानगर दरम्यान रस्त्याच्या दुतर्फा बाजुला गणपती स्टॉल बेकायदेशीरपणे उभे केले आहे. उपनगरीतील एक स्वयंघोषित समितीच्या वरदहस्तामुळे गणपतीचे स्टॉल उभारलेले आहेत. या स्टॉलमुळे वाहतुकीची कोंडी पहायला मिळत आहे.  यातच उपनगरातील त्या समितीमधील सदस्यांनी गणपती स्टॉलधारकाकडून स्टॉल सुरू करण्यासाठी पैसेही उकळल्याची चर्चा आहे. बॉबे रेस्टॉरंट चौक उड्डाणपुल ते कृष्णानगर दरम्यान अनाधिकृतपणे गणपतीचे 50 स्टॉल आहेत. या स्टॉलमुळे सातार्‍यातील स्थानिक गणेश उत्सवासाठी सार्वजनिक मंडळांना पीयुपी मधील आकर्षक मुर्त्या तसेच घरगुती प्रतिष्ठापनेसाठी लागणार्‍या आकर्षक बाप्पाच्या मुर्त्या बाँबे रेस्टॉरंट ते कृष्णानगर या ठिकाणी रस्त्याच्या कडेला विक्री केल्या जात होत्या. गेल्या दोन वर्षापूर्वी जिल्हाधिकारी डॉ. आश्‍विन मुद्गल, तत्कालीन पोलीस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख तसेच महसुल व पोलीस तसेच बांधकाम विभागाचे अधिकारी यांनी प्लॅस्टीक कागदाच्या राहुट्या (तंबु) घालून परप्रांतीय तसेच स्थानिकांना बाँबे रेस्टॉरंट चौकातील उड्डाणपुलाखाली किंवा सातारा जिल्हा परिषदेच्या मैदानावर स्टॉल उभारून बप्पाच्या मुर्ती विक्री करण्यास परवानगी दिली, मुर्तीकार कलावंतावर गडांतर आले आहे.
बाँबे रेस्टॉरंट चौक उड्डाणपुल ते कृष्णानगर दरम्यान रस्त्याच्या कडेला लावण्यात आलेल्या गणपती स्टॉल संदर्भात आमचा काही संबंध नाही, याशिवाय संबंधित गणपती स्टॉल धारक कोणत्याही प्रकारचा कर खेड किंवा अन्य ग्रामंपचायतीला देत नाहीत तसेच आम्हीही कर घेत नाही….मिलींद कदम, सरपंच ग्रा.प.खेड.