म्हासुर्णे येथील छत्रपती संभाजी राजे महाराज गणेश मंडळाची उत्साहात

म्हासुर्णे : (प्रतिनिधी  तुषार माने ) म्हासुर्णे येथील छत्रपती संभाजी राजे महाराज गणेश मंडळाची उत्साहात मिरवणूक सुरु झाली या मंडळाची मिरवणूक अतिशय साध्या पध्दतीने काढण्यात आली डॉल्बी बंदी असल्यामुळे या वर्षी मंडळाने पर्यावरण संतुलन राहण्यासाठी साध्या पध्दतीने “गणपती बाप्पा मोरया” घोषणा देवुन मिरवणूक काढुन या मंडळाने गावा समोर एक आदर्श निर्माण केला आहे त्यामुळे सर्व स्तरातुन या मंडळाचे कौतुक होत आहे आणी विशेष म्हणजे या मंडळातील बहुसंख्य सदस्य हे मुस्लीम समाजातील असुन या समाजातील सदस्यांनी अतिशय सुंदर आशा पध्दतीने अकरा दिवस गणेश उत्सव पुजा चांगल्या पध्दतीने करुन हिंदु-मुस्लीम असा भेदभाव न करता हम सभ भाई भाई अशा पध्दतीने गणेश उत्सव साजरा करुन गणेश विसर्जन मध्ये मोठया संख्येने सहभागी होवुन मिरवणूकीला सुरूवात केली.हिंदुबांधवानी आणि मुस्लीम बांधवांनी ऐक्याचे आणि सामाजिक सलोख्याचे उदारण जगापुढे ठेवले आहे असा स्तुत्य उपक्रम छत्रपती संभाजी राजे गणेश मंडळाने समाजासमोर ठेवला आहे.आणि १९८३ साली गणेशोत्सव व मोहरम हे दोन्ही सण एकत्र आले होते.बरोबर ३५ वर्षानंतर हे दोन्ही सण पुन्हा एकत्र आले होते त्यामुळे दोन्ही बांधवानी एकत्र सण साजरा करण्याचा आनद चेहऱ्यावर स्पष्ट जाणवत होता.यातुन हिंदु -मुस्लीम एकता पहावयास मिळाली.