स्वप्नील रेस्टॉरंटमध्ये गॅस टाकीचा स्फोट

कराड: येथील चावडी चौकातील सुभाष गिरी यांच्या स्वप्नील रेस्टाँरंटं मधील गॅस टाकीचा अचानक स्फोट झाल्याने नागरीकांची घबराट उडाली.या स्फोटामुळे  हॉटेल मधील व शेजारील दुकानदारांचे लाखो रूपयांचे नुकसान झाले हि घटना सकाळी 6.30 घडली.
स्वप्निल रेस्टॉरंटंचे मालक सुभाष गिरी यांनी नेहमी प्रमाणे आपला व्यवसाय सुरू केला मात्र रेस्टाँरंट मधील गॅस टॉकीचा अचानक स्पोट झाला. या स्फोटात कोणतीही जीवित हानी झाली नाही. परंतु गिरी यांच्या हॉटेल मधील सामान व आजुबाजुच्या दुकानादारांच्या समानांची मोड-तोड झाली. या रेस्टाँरंटच्या जवळच असलेल्या वडाफोन कंपनीच्या शोरूमच्याही काचाही फुटल्या  झालेल्या स्फोटाचा आवाज ऐवढा भयावह होता की आजुबाजुच्या बिल्डींग मधील व रत्यावरील नागरिकात घबराट उडाली. स्फोटानंतर स्वप्निल रेस्टॉरंटच्या समोर बघ्यांची गर्दी झाली होती. पोलिसांना घटनेची माहिती समजताच त्यांनी घटनास्थळाची  पाहणी केली व झालेल्या नुकसानीचा पंचनामा केला.