गौरीशंकरने सावकार ट्रॉफी जिंकली ; कबड्डी स्पर्धेत विजेतेपद ; 22 इंजिनिअरींग महाविद्यालयांचा सहभाग 

सातारा : तंत्रशिक्षण क्रिडाविश्‍वात मानाचे समजली जाणारी सावकार ट्रॉफी यंदा गौरीशंकरच्या सातारा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अ‍ॅन्ड मॅनेजमेट, लिंबच्या महाविद्यालयाने पटकविली. 
जिल्हातील 22 इंजिनिअरिंग महाविद्यालयांनी यामध्ये सहभाग घेतला होता. अटीतटीच्या झालेल्या कबड्डी स्पर्धेत गौरीशंकरच्या सातारा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अ‍ॅन्ड मॅनेजमेटच्या व़ि़द्यार्थ्यानी सरस खेळ करत प्रथम क्रमांक प्राप्त केला.
यामध्ये कर्णधार ओंकार वंजारे, प्रसाद मरगजे, विजय बरकडे, रुपेश सांवत, सुरज चव्हाण, अमित भुजबळ, मिश्रेश इथापे, सागर शिंदे, सागर भोसले, अक्षय पावशे, शुभम निकम यानी उत्कृष्ट चढाई करुन प्रक्षेकाची मने जिकली. तर विजय बरकडे यांनी उत्कृष्ट पकडी केल्या. या स्पर्धा अरविंद गवळी इंजिनिअरिंग कॉलेज वर्ये येथे घेण्यात आल्या. प्राप्त केलेल्या यश बदल गौरीशंकरचे जनसंपर्क अधिकारी श्रीरंग काटेकर यानी व़िद्यार्थ्याचा उचित गौरव केला.
विद्यार्थ्यांनी प्राप्त केलेल्या यशाबदल गौरीशंकर संस्थेचे चेअरमनसोा प्रा. मदनराव जगताप, व्हा. चेअरमन मिलिंद जगताप, सर्व संचालक मंडळ, प्रशासकिय अधिकारी नितीन मुडलगीकर, प्राचार्या डॉ. विद्युलता मोहीते यानी अभिनंदन केले.